गोमांसाच्या संशयावरून पाच जणांवर जमावाने केला हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:20 AM2017-10-15T01:20:50+5:302017-10-15T01:21:17+5:30

येथून जवळच असलेल्या गोसी गावाच्या परिसरात गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकासह पाच जणांवर १00 हून अधिक लोकांच्या जमावाने हल्ला केला.

Gumansa's suspicions made the mob attack on five people | गोमांसाच्या संशयावरून पाच जणांवर जमावाने केला हल्ला

गोमांसाच्या संशयावरून पाच जणांवर जमावाने केला हल्ला

Next

फरिदाबाद (हरयाणा) : येथून जवळच असलेल्या गोसी गावाच्या परिसरात गोमांस वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकासह पाच जणांवर १00 हून अधिक लोकांच्या जमावाने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या पाच जणांपैकी चौघांना प्रथमोपचारानंतर घरी पाठवण्यात आले असून, एकावर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. देशात गेल्या वर्षापासून गोरक्षकांकडून हल्ले होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा हल्ल्यांत काही ठिकाणी मृत्यूही झाले आहेत. हरयाणातही एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.

गोहत्येच्या संशयावरून हे हल्ले होत आहेत. गोरक्षक म्हणवून घेणा-यांनी तर पाळण्यासाठी विकत घेतलेल्या गायी गावी नेणा-या लोकांवरही हल्ले केले आहेत.

Web Title: Gumansa's suspicions made the mob attack on five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा