शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

Gujarat Truck Accident: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले, १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 2:13 AM

पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

सूरत : रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या स्थलांतरीत मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्घटना गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी घडली. मृतात एका मुलीचा, तर ८ महिलांचा समावेश आहे. यातील एक कामगार मध्यप्रदेशचा आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्व मजूर राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा अपघात सुरतपासून जवळपास ६० किमी अंतरावर कोसांबा गावाजवळ झाला. भरधाव ट्रक अगोदर एका उसाच्या ट्रॅक्टरला धडकला. त्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हे लोक किम - मांडवी रोडच्या बाजुला झोपले होते. भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. ट्रॅक्टरला धडकल्यानंतर ट्रकची पुढील काच फुटली. त्यामुळे चालकाला समोरचे काही दिसले नाही. धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. याच ठिकाणी झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. जखमी तीन लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना केंद्र, राज्याकडून मदत -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातAccidentअपघातSuratसूरत