हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 04:07 PM2021-03-29T16:07:32+5:302021-03-29T16:08:22+5:30

Land On Moon : आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे.

gujarat surat businessman purchased 1 acre land on moon | हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

हौसेला मोल नाही! 2 महिन्यांच्या लेकासाठी 'त्याने' थेट चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत अन् बरंच काही...

googlenewsNext

नवी दिल्ली - काही लोक हौसेसाठी काहीही करतात. म्हणूनच हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं. अशीच एक घटना गुजरातच्यासूरतमध्ये घडली आहे. ग्रह-तारे हे सर्वांनाच खुणावत असतात. चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा अनेकांनी कधीतरी मनोमन विचार देखील केला असेल. पण आता सूरतमध्ये एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावरच (Moon) जमीन विकत घेतली आहे. एका व्यापाऱ्याने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. विजयभाई कथीरिया असं जमीन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव आहे. 

कथीरिया यांनी आपल्या दोन महिन्याच्या मुलाचं नाव नित्या ठेवलं असून नुकतंच त्यांनी त्याच्यासाठी थेट चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला होता. यावर त्यांना 13 मार्चला अप्रूवल मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले. त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्रही मिळालं आहे. त्यांना चंद्राच्या दुसर्‍या बाजूला जमीन दिली गेली आहे. त्या ठिकाणचे नाव मेर मॉस्कोव्हियन्स आहे. 

सी ऑफ मस्कॉवी असं देखील म्हणतात. जमीन खरेदीच्या किंमतीचा अहवालात खुलासा केला गेलेला नाही. मात्र याची किंमत 750 डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 54 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. चंद्रावर जमीन घेणारे विजयभाई कथीरिया सूरतचे पहिले व्यापारी ठरले आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा चंद्रावर जमीन खरेदी करतो तेव्हा त्याला एक प्रमाणपत्रही दिलं जातं. याला अत्यंत मोलाचं गिफ्ट समजलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: gujarat surat businessman purchased 1 acre land on moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.