शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

गुजरात मॉडेल? दहावीच्या परीक्षेत 63 शाळांमधील 100% विद्यार्थी नापास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 5:58 PM

यंदा गुजरात बोर्डाचा निकाल 66.97 टक्के

गांधीनगर: गुजरातशिक्षण विभागाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाबद्दलची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील 63 शाळांमधील एकाही विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होता आलेलं नाही. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 66.97 टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात किंचित घसरण झाली. गेल्या वर्षी गुजरात बोर्डाचा निकाल 67.5 टक्के लागला होता. गुजरातच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष ए. जे. शहा यांनी निकालाबद्दल अधिक माहिती दिली. यंदा राज्यातील 8,22,823 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यातील 5,51,023 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी आकडेवारी त्यांनी दिली. ज्या शाळांमधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही, अशा शाळांची संख्या 63 इतकी असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. आधी अपयशी ठरल्यानं पुन्हा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरीदेखील यंदा फारशी चांगली झाली नाही. पुन्हा परीक्षेला बसलेले केवळ 17.23 टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले. यंदाही उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. परीक्षा दिलेल्या एकूण मुलींपैकी 72.64 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 62.83 इतकी आहे. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी यंदा बाजी मारली. इंग्रजी माध्यमात शिकणारे 88.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हिंदी माध्यमाचे 72.66 टक्के, गुजराती माध्यमाचे 64.58 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.  

टॅग्स :GujaratगुजरातSSC Resultदहावीचा निकालEducationशिक्षण