भीषण अपघात! गुजरातमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 38 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 10:00 IST2023-10-31T09:59:36+5:302023-10-31T10:00:47+5:30

अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 सैनिक होते. त्यापैकी 38 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलोल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

gujarat panchmahal bus carrying jawans overturns 38 injured | भीषण अपघात! गुजरातमध्ये जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 38 जखमी

फोटो - hindi.news24online

गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी सैनिकांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात राज्य राखीव पोलीस (SRP) चे 38 पोलीस जखमी झाले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, एमएल गोहित या पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 38 सैनिक जखमी झाले आहेत. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांची प्रकृती स्थिर आहे.

ब्रेक फेल झाल्याने अपघात 

ही घटना घडली तेव्हा जवान गोळीबाराचा सराव पूर्ण करून परतत होते, अशी माहिती अधिकाऱ्यानी दिली आहे. अपघाताची माहिती देताना ते म्हणाले, ब्रेक फेल झाल्याने बस उलटली आहे. 

9 जवान गंभीर जखमी

रिपोर्टनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये 50 सैनिक होते. त्यापैकी 38 जवान जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलोल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 29 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमी असलेल्या नऊ जणांना उपचारांसाठी वडोदरा येथील सयाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे बस दरीत कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

Web Title: gujarat panchmahal bus carrying jawans overturns 38 injured