पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 23:44 IST2025-02-18T23:43:06+5:302025-02-18T23:44:22+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेचेही आभार मानले आहेत.

gujarat municipal elections 2025 bjp sweeps municipal election PM Modi said, 'Unbreakable relation with Gujarat | पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

पालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचा 'सुपडा साफ', भाजपचा 'डंका'; PM मोदींनी म्हणाले, 'गुजरात से अटूट नाता'!

भाजपने गुजरातमधील आपले गड आणखी मजबूत केले आहेत. तेथे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसचा पार 'सुपडा साफ झाला आहे'. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढ्या मोठ्या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जनतेचेही आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल, सोशल मीडिया प्लॅटपॉर्म X वरून पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "गुजरातचे भाजपसोबत असलेले नाते केवळ अतूटच नाही, तर ते सातत्याने घट्टही होत चालले आहे!' राज्यात झालेल्या पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपला पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानतो. विकासाच्या राजकारणाचा हा आणखी एक मोठा विजय आहे. यामुळे आमच्या कर्मठ कार्यकर्त्यांना अधिक उर्जेने लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. ज्यांच्या अथक परिश्रमाने आणि प्रयत्नांमुळे हा शानदार विजय मिळाला, त्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो."

गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये भाजपचा मोठा विजय - 
गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. निवडणूक झालेल्या ६८ पालिकांपैकी ६० पालिकांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर काँग्रेसला केवळ एका नगरपालिकेत विजय मिळवता आला आहे. आम आदमी पक्षाला एकाही पालिकेत विजय मिळालेला नाही. तर समाजवादी पार्टीने दोन पालिकांमध्ये विजय मिळवला आहे. तीन पालिकांमध्ये टाय झाली आहे. तर एका पालिकेत अपक्षांनी वर्चस्व राखले आहे. तर एका पालिकेमध्ये कुणालाही बहुमत मिळालेले नाही.

गेल्या वेळी गुजरातमध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपाने ६८ पैकी ५१ पालिकांमध्ये विजय मिळवला होता. या वेळी हा आकडा ६० पर्यंत पोहोचला आहे. एकूणच स्थानिक पालिकांमध्ये भाजपाने एकूण १४०३ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने २६०, समाजवादी पार्टीने ३४, आपने २८ आणि बसपाने १९ जागांवर विजय मिळवला आहे. तर १५१ जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत.
 

Web Title: gujarat municipal elections 2025 bjp sweeps municipal election PM Modi said, 'Unbreakable relation with Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.