शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये मुलींना पोहून शाळेत जावे लागते

By admin | Updated: August 5, 2014 16:52 IST

गुजरातमधील विकास मॉडेलचे दाखले देणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पोहून शाळेत जावे लागत आहे

ऑनलाइन टीमअहमदाबाद, दि. ५ - गुजरातमधील विकास मॉडेलचे दाखले देणा-या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना चक्क पोहून शाळेत जावे लागत आहे. गावातील नदीवर पुल बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापूर्वी दररोज पोहण्याची परीक्षा द्यावी लागत आहे. मध्य गुजरातमधील आदिवासी विभागातील १०० विद्यार्थांना पोहून शाळेत जावे लागते. यामध्ये ३० मुलींचाही सहभागह आहे. शाळेचा गणवेश घालून आपले दप्तर एका हंड्यात ठेवून एक दोन नव्हे तर तब्बल सहा किलोमिटर त्यांना पोहून जावे लागते. अर्थातच येतानाही तोच रस्ता असतो. आपल्यासाठी हे अंतर सहा किलोमिटर अतकं असलंतरी या मुलांसाठी हा शॉर्टकट आहे. रस्त्याने शाळेत जायचे झाल्यास २० किलोमिटर इतकं अंतर कापावं लागतं. नदीच्या पैलतिरावर एका व्यक्तीला मुलं निट येताहेत की नाही हे पाहण्याचे काम देण्यात आले आहे. मध्यगुजरातच्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची ही दैनंदीनी आहे. ही समस्या गावक-यांनी २००९ साली मोदींच्या कानावर घातली होती. परंतू २०१४ मध्येही इथल्या लोकांचे अजून अच्छेदिन आलेले नाहीत.तसेच जिल्ह्यातील प्रशासकीय अधिका-यांना या प्रकरणी विचारले असता त्यांनी सरकार या प्रकरणी लवकरच तोडगा काढणार असून त्यातकरता १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुलांना सायकल बाईक आणि मिनी बसची सुविधा उपलबध करून दण्यात येणार असल्याचे सरकारी ठेवणीतील उत्तर अधिकारी देत आहेत. या प्रकरणी सराकरदरबारी टाचा झिजवूनही काही फयदा झाला नाही. असं हतबलपणे इथले सरपंच सांगतात.