Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये AAP ला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:06 PM2022-12-08T17:06:40+5:302022-12-08T17:07:22+5:30

Gujarat Election Results 2022: AAPचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांचा भाजप उमेदवार विनोदभाई यांनी 64629 मतांनी पराभव केला.

Gujarat Election Results 2022: Big blow to AAP in Gujarat; Chief Minister candidate along with the state president lost | Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये AAP ला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही पराभूत

Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये AAP ला मोठा धक्का; प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्रिपदाचा उमेदवारही पराभूत

Next

Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाचे नेते सरकार स्थापनेचा दावा करत होते आणि आता पक्षाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. विशेष म्हणजे, आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया (Gopal Italia) यांचाही पराभव झाला आहे. सुरतच्या कतारगाम जागेवर भाजप उमेदवार विनोदभाई यांनी इटालियांचा 64629 मतांनी पराभव केला.

प्रदेशाध्यक्ष पराभूत
विनोदभाई अमरशीभाई मोराडिया यांना 120342 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोपाल इटालिया यांना 55713 मतदारांचा पाठिंबा मिळाला. काँग्रेसचे उमेदवार वरिया कल्पेश हरजीवनभाई यांना 26807 मते मिळाली आहेत. या सीटवरील 1521 लोकांनी NOTA बटण दाबले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच इटालिया पिछाडीवर पडले होते.

मुख्यमंत्रिपदाचे उमेदवारही पराभूत
2015 च्या पाटीदार आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे गोपाल इटालिया यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील पक्षाची कमान सोपवली होती. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, केजरीवालांनी इसुदान गढवींना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार केले. विशेष म्हणजे गढवीदेखील पराभूत झाले आहेत. खंभलिया मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 

Web Title: Gujarat Election Results 2022: Big blow to AAP in Gujarat; Chief Minister candidate along with the state president lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.