शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : प्रचाराच्या मैदानात आजपासून उतरणार पंतप्रधान नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 12:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चार सभांना संबोधित करणार आहेत. भुज, जसदण, धारी अमरेली व कमरेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील वातावरण अधिक तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचाराचा धडाका सुरू आहे. सोमवारपासून (27 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. येथील जनसभांना ते संबोधित करणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चार सभांना संबोधित करणार आहेत. भुज, जसदण, धारी अमरेली व कमरेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. प्रचार सभांचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आशापुरा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.  

दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जवळपास एक महिन्यापासून गुजरातचा दौरा करत आहेत, येथील जनतेशी संवाद साधत आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत गुजरातमधील भाजपा सरकारवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राहुल गांधी यांच्या टीकांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.  मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये जवळपास 30 जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले होते की, सोमवारपासून गुजरातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा सुरू होणार आहे. माझी पहिली सभा भूजमधील कच्छ येथे असणार आहे. हा जिल्हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे. 2001मध्ये आलेल्या भूकंपानंतर जगानं पाहिलंय की येथे कशापद्धतीनं प्रगती झाली आहे. ज्यामुळे समाजाच्या प्रत्येक वर्गाला फायदा प्राप्त झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 नोव्हेंबरला सोमनाथ येथील प्राची, भावनगरच्या पालिताणा आणि नवसारी येथे सभा होणार आहे. या सर्व भागांत 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

आतापर्यंत 148 उमेदवारांच्या नावाची घोषणा दरम्यान, भाजपानं आतापर्यंत 182 जागांपैकी 148 जागांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाकडून 5 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 70, दुस-या यादीत 36,  तिस-या यादीत 28, चौथ्या यादीत 1 आणि पाचव्या यादीत 13 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले होते.    

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेस