शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Gujarat Election 2022: खाम, कोकम, खाम्प, बदाम, ऑप्ट... राजकारणात जातींची बेरीज-वजाबाकी

By यदू जोशी | Updated: November 25, 2022 08:00 IST

Gujarat Assembly Election 2022: मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते.

- यदु जोशीगांधीनगर : मराठी माणूस सकाळी उठल्यापासून जातीपातीचा विचार करतो अन् गुजराती माणूस उठल्यापासून शेअर बाजाराचा विचार करतो, असे म्हटले जाते. पण गुजरातची निवडणूक कव्हर करताना इथला माणूसही जातीपातींमध्येच अडकला असल्याचे जाणवते. विविध पक्षांनी जातींच्या आधारावर केलेले तिकीटवाटप त्याची साक्ष देते. मात्र यावेळी जातीय समीकरणांवर विकासाचा मुद्दा भारी राहील, असे मानणारा मोठा वर्गही आहे. आर्थिकदृष्ट्या समृद्ध अशा या राज्यात जातींच्या जाणिवाही तितक्याच गडद आहेत. १९९० मध्ये चिमणभाई पटेल यांनी कोकम (केओकेएम) फॉर्म्युल्याच्या आधारे ७० जागा जिंकल्या, भाजपबरोबर युती करत मुख्यमंत्रिपद मिळविले. कोकम म्हणजे कोळी, कानबी (पटेल), मुस्लिम. २०१७ मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भारतसिंह सोळंकी यांनी आपले दिवंगत पिता माधवसिंह सोळंकी यांचा खाम फॉर्म्युला विस्तारला तो खाम्प या नावाने. खाममध्ये त्यांनी पाटीदारांना जोडले. तरीही काँग्रेस जिंकू शकली नव्हती. 

भाजपने सुरुवातीपासूनच ऑप्ट (ओपीटी) समीकरणाला जन्म घातला. म्हणजे ओबीसी, पाटीदार अन् आदिवासी. या तीन समाजांची ७४ टक्के व्होटबँक भाजपला गेली २७ वर्षे भरभरून विजय देत राहिली. काही विश्लेषकांच्या मते भाजपने ऑप्टचा आभास निर्माण केला; पण त्यांची व्होटबँक जैवाबाप म्हणजे जैन, वैश्य, ब्राह्मण आणि पाटीदार अशीच होती.  गेल्यावेळी हार्दिक पटेल यांच्या नेतृत्वात पाटीदार काँग्रेससोबत गेले, तरीही परीक्षा भाजपनेच जिंकली. आता पटेल भाजपमध्ये आहेत.

यावेळचे चित्र? भाजप : जैवाबापवरील भिस्त कायम ठेवत ऑप्ट फॉर्म्युला आणला आहे. काँग्रेस : खाम, खाम्पच्या ऐवजी बदाम बक्षीपंच (म्हणजे ओबीसी), दलित व मुस्लिम असे समीकरण जुळवू पाहत आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी याचे सूतोवाच केले.आम आदमी पार्टी : जातींऐवजी कामगार, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी असे विविध वर्गांवर लक्ष.

२०१५ मध्ये पाटीदार, ओबीसी आंदोलनांनी पुन्हा एकदा जातीयतेचा बोलबाला होता; पण यावेळी असे दिसत नाही. गुजरात व गुजरातींचे प्रश्न हा मुद्दा केंद्रस्थानी दिसत आहे.    - दिलीप गोहिल, राजकीय     विश्लेषक, अहमदाबाद

महाराष्ट्रातही फॉर्म्युलेआपल्याकडे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी माधव फॉर्म्युला आणला होता. म्हणजे माळी-धनगर-वंजारी. काँग्रेसचे तत्कालीन नेते माधवसिंह सोळंकी यांनी ऐेंशीच्या दशकात खाम (केएचएएम) फॉर्म्युला आणला. म्हणजे कोळी, क्षत्रिय हरिजन, आदिवासी आणि मुस्लिम या समाजाची मोट बांधून ते मुख्यमंत्री झाले.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप