Gujarat Crime: गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्याने महिला शिक्षिकेला वर्गातच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना वर्गात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वर्गात उशिरा आल्याच्या कारणावरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत परीक्षा सुरू होती. आरोपी विद्यार्थी वर्गात उशिरा आला, याचे कारण विचारताच शिक्षिकेसोबत त्याचा वाद सुरू झाला. वाद वाढल्यावर विद्यार्थ्याने अचानक शिक्षिकेच्या कानशिलात लगावली. हा प्रकार पाहून शाळेतील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
पोलिसांनी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले
या घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. सध्या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अशा घटनांमुळे शाळेतील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण बिघडते, असेही पोलिसांनी नमूद केले.
गांधीनगरमध्ये शिक्षिकेला कारावासाची शिक्षा
दरम्यान, गुजरातमधीलच गांधीनगर जिल्ह्यातील एका वेगळ्या प्रकरणात न्यायालयाने खासगी शाळेतील शिक्षिकेला तीन वर्षे तीन महिने तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या नोंदींनुसार, इयत्ता 9वीतील 14 वर्षीय विद्यार्थिनीने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे विज्ञान विषयाच्या शिक्षिका पारुलबेन यांनी रागाच्या भरात विद्यार्थिनीच्या डाव्या गालावर चापट मारली होती. यामुळे विद्यार्थिनीच्या कानाचा पडदा फाटला आणि डॉक्टरांनी तिची श्रवणशक्ती कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले.
Web Summary : In Gujarat, a student assaulted a teacher for questioning his late arrival. The incident, captured on CCTV, led to police intervention. Separately, a teacher in Gandhinagar received a prison sentence for slapping a student, causing permanent hearing loss.
Web Summary : गुजरात में, एक छात्र ने देरी से आने पर सवाल करने पर शिक्षिका पर हमला किया। सीसीटीवी में कैद घटना के बाद पुलिस ने हस्तक्षेप किया। अलग से, गांधीनगर में एक शिक्षिका को छात्र को थप्पड़ मारने के लिए जेल हुई, जिससे स्थायी रूप से सुनने की शक्ति चली गई।