गुजरात : पोलिसाने अडवलं म्हणून थेट उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 16:35 IST2018-01-10T16:33:45+5:302018-01-10T16:35:57+5:30
गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका भरधाव कारचालकानं थेट पोलीस चालकालाच उडवल्याची घटना घडली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे.

गुजरात : पोलिसाने अडवलं म्हणून थेट उडवलं, सीसीटीव्हीत थरार कैद
बनासकांठा : गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यात एका भरधाव कारचालकानं थेट पोलीस चालकालाच उडवल्याची घटना घडली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही थरारक घटना कैद झाली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी करणाऱ्या पोलिसाला उडवून माथेफिरु कारचालक फरार झाला आहे. thequint.com ने याबाबत वृत्त दिलं आहे.
या घटनेमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर या माथेफिरुला शोधण्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
बनासकंठा येथील महामार्गावर चेकपोस्टजवळ पोलीस तपासणी सुरु होती. यावेळी भरधाव वेगानं येणा-या एका कारचालकाला थांबवण्याचा या पोलीस कर्मचा-याने प्रयत्न केला. पण गाडी थांबवण्याऐवजी त्या कारचालकाने थेट पोलीस कर्माचा-याच्या अंगावर गाडी घातली आणि तेथून फरार झाला.
पाहा व्हिडीओ -