Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:35 IST2025-10-17T16:31:07+5:302025-10-17T16:35:50+5:30
Arjun Modhwadia: नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेते राहिलेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. २०२४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
Gujarat Cabinet Expansion arjun modhwadia News: पोरबंदरचे आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया यांची मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सरकारमध्ये एन्ट्री झाली. शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. अर्जून मोढवाडिया हे काँग्रेसमधील सर्वात ज्येष्ठ नेते होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते विरोधी पक्षनेते होते. राम मंदिर सोहळ्याबद्दल काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शुक्रवारी झाला. नव्या मंत्रिमंडळात एकूण २६ मंत्री असणार असून, हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्री म्हणून प्रमोशन मिळाले आहे.
#WATCH | Gandhinagar | BJP's Arjun Modhwadia takes oath as Gujarat cabinet minister pic.twitter.com/mjaZblsmwz
— ANI (@ANI) October 17, 2025
कोण आहेत अर्जून मोढवाडिया?
पोरबंदरचे आमदार असलेले अर्जून मोढवाडिया याचा जन्म १७ फेब्रुवारी १९५७ रोजी झाले आहे. मोढवाडा हे त्यांचं जन्मगाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मोढवाडिया यांना एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत.
त्यांचे शिक्षण जि.प. शाळेतच झाले. त्यांनी मोरबी येथील लखधीरजी इंजिनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. गुजरातमध्येच इंजिनिअर म्हणून नोकरी केली. १९९३ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कार्यात उतरले. तिथूनच त्याची राजकारणाकडे वाटचाल सुरू झाली.
मोढवाडिया २००२ मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. सुरूवातीपासून त्यांनी काँग्रेसचे काम केले. २०२४ मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले.
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले नाही आणि सोहळ्याला जाण्याचे टाळल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी काँग्रेस सोडली होती. २०२४ मध्ये ते भाजपमध्ये आले. त्यानंतर वर्षभरातच त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यांच्याकडे मत्स्य खाते दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
गुजरात मंत्रिमंडळ विस्तार : सर्व मंत्र्यांची यादी
भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री
हर्ष सांघवी, उपमुख्यमंत्री
त्रिकम बीजल चांगा
स्वरुपजी ठाकोर
प्रत्रवणकुमार गोर्धनजी माळी
ऋतिकेश गणेशभाई पटेल
पीसी बराडा
दर्शना एम. वाघेला
कांतीलाल शिवलाल अमृतिया
वरजीभाई मोहनभाई बावलिया
रिवाबा जडेजा
अर्जून मोढवाडिया
डॉ. प्रद्यमन वाजा
कौशिक कांतीभाई वेकरिया
परशोत्तम सोलंकी
जितेंद्रभाई सावजीभाई वाघाणी
रमणभाई भीखाभाई सोलंकी
कमलेशभाई रमेशभाई पटेल
संजय सिंह महेदा
रमेशभाई भूराभाई कटारा
मनीषा राजीवभाई वकील
ईश्वर सिंह ठाकोरभाई पटेल
प्रफुल पानसेरिया
जयारामभाई गामित
नरेशभाई पटेल
कनुभाई देसाई