शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत यांच्या त्या विधानामुळे गुजरात भाजपासह, काँग्रेसही संतप्त, अल्पेश ठाकोर यांनी दिली तोंड काळं करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 10:27 IST

कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरात भाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे.

ठळक मुद्देकंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी गुजरातचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता राऊत यांच्या या विधानाला गुजरात भाजपासह काँग्रेसनेही घेतला जोरदार आक्षेप भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

अहमदाबाद - सध्या शिवसेना नेते संजय राऊत आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील वाद चांगलाच रंगला आहे. दोन्हींकडून एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी होत आहे. दोघांच्याही समर्थकांकडूनही एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता कंगनासोबतच्या वादादरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानावरून गुजरातभाजपासह काँग्रेसही कमालीची संतप्त झाली आहे.कंगनावर टीका करताना संजय राऊत यांनी गुजरातचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता. राऊत यांच्या या विधानाला गुजरात भाजपासह काँग्रेसनेही जोरदार आक्षेप घेतला आहे. गुजरातमधील करणी सेनेने त्यांचा पुतळा जाळला आहे. तर भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनी संजय राऊत यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांस सिंह राजपूतच्या मृत्यवरून सध्या राजकारण पेटले आहे. दरम्यान या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची धग गुजरातपर्यंत पोहोलची आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हटल्यावर प्रतिक्रिया देताना गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ, मनीष दोषी म्हणाले की, गुजरात महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांची भूमी आहे. येथे अनेक शूरवीर आणि दानवीरांनी जन्म घेतला आहे. राऊत यांचे हे विधान वैयक्तिक आहे. मात्र अशी विधाने गुजरात खपवून घेणार नाही.दरम्यान, माजी आमदार आणि भाजपा नेते अल्पेश ठाकोर यांनीही राऊत यांच्याविरोधात आक्रम भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांनी अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानच्या रूपात करून गुजरातचा अपमान केला आहे. गुजरात अशी विधाने सहन करणार नाही, असा इशारा अल्पेश ठाकून यांनी दिला आहे.करणी सेनेनेही या विधानाविरोधात आक्रमक होत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले. तसेच या विधानासाठी संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे. भाजपाचे प्रसारमाध्यम प्रवक्ते प्रशांत वाला यांनीी राऊत यांचे विधान दुर्दैवी असल्याचे सांगत माफीची मागणी केली आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतGujaratगुजरातBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रKangana Ranautकंगना राणौत