शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2017 6:46 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली.

ठळक मुद्देकच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले.दुस-या टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणार असून, 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. पहिल्या टप्प्यात गुजरातमध्ये 68 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बी.बी.स्वॅन यांनी दिली. गुजरात विधानसभेमध्ये एकूण 182 जागा आहेत. 

कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. दुस-या टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणार असून, 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदान केंद्रांवरुन ईव्हीएम मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. 

या ठिकाणची मतदान यंत्रे बदलण्यात आली. काँग्रेसने काही ईव्हीएममशीन मोबाइलमधल्या ब्लू टुथला जोडली असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळून लावला.  89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या परिक्षेत पंतप्रधान कोण पास होते, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं होतं. 

 

पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत. 

 

 राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.एकीकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पंतप्रधानपदापर्यंत प्रवास केलेले नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारे राहुल गांधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गड राहुल गांधी सर करणार का ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. 

राहुल गांधी आता अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं फारच महत्वाचं आहे. आपल्याला सिद्ध करण्याची ही अजून एक संधी त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे  सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा सत्तेवर येणं तितकंच महत्वाचं आहे. तसं न झाल्यास मोदींच्या तुलनेत राहुल गांधींचं राजकीय वजन वाढेल यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष ही निवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017