Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:40 PM2022-12-07T15:40:51+5:302022-12-07T15:41:14+5:30

उद्या म्हणजेच 8 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निकालांवर संपूर्ण देशाची नजर लागून आङे.

Gujarat Assembly Election: Rivaba, Hardik, Jignesh to Italia; What does the exit poll say about these candidates..? | Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

Gujarat Assembly Election: रिवाबा, हार्दिक, जिग्नेश, गढवी ते इटालिया; या उमेदवारांबाबत एक्झिट पोल काय सांगतो..?

googlenewsNext

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 182 सदस्यीय विधानसभेत काही जागा अशा आहेत, जिथे निकराची लढत पाहायला मिळाली आहे. यामध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ते सर्वात तरुण उमेदवार हार्दिक पटेल आणि आपचे हेवीवेट गोपाल इटालिया यांच्या जागांचा समावेश आहे. जाणून घेऊन काय आहे या जागांचे एक्झिट पोल..

गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. विधानसभा निवडणुकीच्या सर्व एक्झिट पोलने पुन्हा एकदा भाजपला दणदणीत विजयाची शक्यता वर्तवली आहे. 182 सदस्यीय विधानसभेत भाजप विक्रमी विजयाकडे वाटचाल करेल अशी अपेक्षा आहे. भाजपला 125 पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये हेवीवेट उमेदवारांच्या जागांबाबत माहिती देण्यात आली आहे.

1. विरमगाम
2017 पूर्वी पाटीदार आंदोलनाद्वारे गुजरातच्या राजकारणात भूकंप आणणारे हार्दिक पटेल अहमदाबाद जिल्ह्यातील विरगाम मतदारसंघातून भाजपचा उमेदवार आहे. पाटीदार आंदोलनानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना कार्याध्यक्ष बनवण्यात आले, परंतु जून 2022 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या जागेवर हार्दिक पटेल हे काँग्रेसचे आमदार लखाभाई भारवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलमध्ये हार्दिक पुढे आहे. ही जागा भाजप काँग्रेसच्या हातून हिसकावून घेत असल्याचे दिसत आहे.

2. खंभालिया
इसुदान गढवी हे गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. या जागेवरून ते निवडणूक लढवत आहेत. एक्झिट पोलमध्ये इसुदान गढवी मागे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे भाजपचे मुलुभाई बेरा आघाडीवर असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ही जागा काँग्रेसकडे होती आणि विक्रम मॅडम आमदार होते, पण तेही मागे आहेत.

3. जामनगर उत्तर
रिवाबा जडेजा ही टीम इंडियातील स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आहे. जामनगर उत्तर मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत रिवाबा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. एक्झिट पोलमध्ये रिवाबा जडेजा विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचे उमेदवार बिपेंद्रसिंह जडेजा आणि आपचे उमेदवार करसनभाई करमूर रिंगणात आहेत.

4. कातरगाम
सुरत शहरातील या जागेवरून आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया रिंगणात आहेत. एक्झिट पोलमध्ये इटालिया पुढे राहण्याची अपेक्षा आहे. येथे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विनू मोराडिया आणि काँग्रेसचे कल्पेश वारिया यांच्याशी इटालियाची लढत आहे.

5. वडगाम
काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी येथून दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. गेल्या वेळी मेवाणी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झाले होते. यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर लढत आहेत. येथून मेवाणी पुन्हा विजयी होण्याची शक्यता आहे. मेवाणी यांना घेराव घालण्यासाठी भाजपने येथून माजी आमदार मणिलाल वाघेला यांना उमेदवारी दिली आहे.
 

Web Title: Gujarat Assembly Election: Rivaba, Hardik, Jignesh to Italia; What does the exit poll say about these candidates..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.