शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल बदलणार? काही मतदार संघातील पुनर्मतमोजणीसाठी हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:58 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अखेर या निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत सत्ता राखण्यात भाजपाने यश मिळवले होते. मात्र निवडणुकीचे निकाल लागून आता दोन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतर निकालांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गुजरातमधील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.  गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयामध्ये  वेगवेगळ्या व्यक्तींनी 20 याचिका दाखल करून गुजरात विधानसभा निवडणुकीत 5 हजारांहून कमी मतांनी निकाल लागलेल्या मतदारसंघांमधील निकालांना आव्हान दिले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या 20 मतदार संघांपैकी 16 मतदार संघांमधील जयपराजयाचे अंतर हे 3 हजारांहून कमी होते.  तसेच उच्च न्यायालयात ज्या विधानसभा मतदारसंघातील निकालांना आव्हान देण्यात आले आहे, त्यामध्ये अहमदाबादमधील कॅबिनेट मंत्री भूपेंद्र सिंह यांचा धोलका मतदारसंघ, बाबूभाई बोखेरिया यांचा पोरबंदर मतदारसंघ, सी. के राऊजी यांच्या गोध्रा मतदार संघांचा समावेश आहे. त्याखेरीज दानी लिमडा मतदारसंघातून काँग्रेसच्या शैलेश यांनी मिळवलेल्या विजयालाही आव्हान देण्यात आले आहे.   गुजरातच्या उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या वकिलांमार्फत या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये माजी आयपीएस अधिकारी राहुल शर्मा मुख्य याचिकाकर्ते आहेत. त्यांनी न्यायालयामध्ये 5 हजारांहून कमी मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या  काँग्रेस आणि भाजपा नेत्यांच्या विजयाला आव्हान दिले आहे.  दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाची लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.  गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य असल्याने त्यांच्यासाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची  तर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची ही कसोटी समजली जात होती. या निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाने  एकूण 99 जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने 80 जागा जिंकल्या. इतर उमेदवार तीन ठिकाणी विजयी झाले. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातHigh Courtउच्च न्यायालय