अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:06 IST2025-06-13T12:06:35+5:302025-06-13T12:06:35+5:30
अहमदाबाद विमान अपघातानंतर, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये एका ज्योतिषीने ७ जूननंतर मोठा विमान अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती.

अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात २४१ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात केवळ एक प्रवासी बचावला. हे विमान गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघाले होते. मात्र उड्डाणानंतर अवघ्या ३० सेकंदातच ते कोसळले. एअर इंडियाने २४१ नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, या पोस्टमध्ये एका ज्योतिषीने ७ जूननंतर मोठा विमान अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती. याच बरोबर त्यांनी एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती.
ज्योतिषी गौरव पुरोहित यांनी ३१ मे २०२५ रोजी लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. '७ जूननंतर भारतासह अनेक देशांमध्ये विमान अपघात होतील. अशा अनेक घटना अनेक देशांमध्ये घडतील. भारत, अमेरिका, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनमधील मोठ्या आणि प्रसिद्ध लोकांचाही विमान अपघातात मृत्यू होऊ शकतो. सर्वसाधारणपणे, याचा पूर्ण योग बनत आहे." त्यांनी एका मोठ्या लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली आहे.
गौरव पुरोहित लाइव हिन्दुस्तानसोबत बोलताना म्हणाले, "आपण गेल्या पाच वर्षांपासून अशा पद्धतीची भाकितं करत आहोत. आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, अर्थव्यवस्था, क्रीडा, लष्कर यांसारख्या विषयांवर भाकितं करत असतो. याचवेळी, आपली ९९ टक्के भाकितं खरी ठरली आहेत. यात, उत्तर प्रदेश निवडणुका, राजस्थान निवडणुका आणि आयपीएलमधील संघांच्या कामगिरीसंदर्भातील भाकितं अचूक ठरली आहेत, असा दावाही त्यांनी केला.
गौरव पुरोहित हे मुळचे राजस्थानची राजधानी जयपूर येथील रहिवासी आहेत. ते ज्योतिषशास्त्रीय गणनेच्या आधारावर भविष्यवाणी करत असतात. त्यांनी ज्योतिष विषयात बीए, बीएड आणि एमएपर्यंत शिक्षण घेतले आहे.