गुहेत लपून देत होते आव्हान, उधमपूरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:02 IST2026-02-04T14:00:28+5:302026-02-04T14:02:28+5:30

Udhampur Encounter Update: जम्मू काश्मीरमधल उधमपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारलं आहे. ही चकमक मंगळवारपासून सुरू होती. तसेच दहशतवादी घनदाट जंगलातील गुहेमध्ये लपून सुरक्षा दलांना आव्हान देत होते.

Guhel was giving a hidden challenge, Indian Army killed two terrorists in Udhampur | गुहेत लपून देत होते आव्हान, उधमपूरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान 

गुहेत लपून देत होते आव्हान, उधमपूरमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान 

जम्मू काश्मीरमधल उधमपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीमध्ये भारतीय लष्कराने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारलं आहे. ही चकमक मंगळवारपासून सुरू होती. तसेच दहशतवादी घनदाट जंगलातील गुहेमध्ये लपून सुरक्षा दलांना आव्हान देत होते. हे दोन्ही दहशतवादी वसंतगड परिसरातील गुहेमध्ये लपून बसलेले होते. तसेच या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये सीआरपीएफ आणि CIF डेल्टाचे जवानसुद्धा सहभागी झाले होते.

या दहशदवाद्यांनी मंगळवारी रामनगरमधील जाफर जंगलात सुरक्षा दलांवर गोळीबार केला होता. सुमारे एक तास चाललेल्या या चकमकीमध्ये एका दहशतवाद्याला गोळी लागली होती, मात्र तो त्याच्या सहकाऱ्यासह गुहेमध्ये जाऊन लपला. या गुहेत जाण्यासाठी दोन रस्ते होते. त्यातील एक रस्ता सुरक्षा दलांनी स्फोट घडवून उद्ध्वस्त केला. त्यानंतर जवानांची अतिरिक्त कुमक पाठवून परिसराला घेराव घालण्यात आला.

या चकमकीबाबत व्हाईट नाईट कोअरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, ही कारवाई गोपनिय माहितीवर आधारित होती. यात जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी मिळून दहशतवाद्यांचा शोध घेतला परिसरारा घेराव घातला. मंगळवारी संध्याकाळी अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, पुन्हा एकदा गोळीबार आणि स्फोटाचे आवाज आले. तसेच सुरक्षा दलांनी आपला बंदोबस्त अधिकच चोख केला.

या कारवाईमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात अंडर बॅरल ग्रेनेड लॉन्चरचा वापरही केला. तसेच गुहेमध्ये ड्रोन पाठवून दहशतवादी जिवंत आहेत की मृत याची चाचपणी करण्यात आली. तसेच कुठलाही धोका उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.  

Web Title : उधमपुर मुठभेड़ में भारतीय सेना ने दो आतंकवादियों को मार गिराया।

Web Summary : भारतीय सेना ने उधमपुर में मुठभेड़ में जैश-ए-मोहम्मद के दो आतंकवादियों को मार गिराया। आतंकवादी घने जंगल में एक गुफा में छिपे हुए थे और सुरक्षा बलों को चुनौती दे रहे थे। आतंकवादियों द्वारा सुरक्षा बलों पर गोलीबारी करने के बाद सेना, पुलिस और सीआरपीएफ द्वारा एक संयुक्त अभियान शुरू किया गया।

Web Title : Two terrorists killed by Indian Army in Udhampur encounter.

Web Summary : Indian Army killed two Jaish-e-Mohammed terrorists in Udhampur after a gunfight. The terrorists were hiding in a cave within a dense forest, challenging security forces. A joint operation by the army, police, CRPF was launched after the terrorists fired on security forces.