शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोवंश रक्षा मंडळाने स्वीकारले शिरापूर छावणीचे पालकत्व बिपीनभाई पटेल यांची माहिती : सुलोचनार्शी साध्वीजी यांच्या प्रेरणेतून संकल्पनेला चालना

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर :

सोलापूर :
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे अनिल पाटील व बापूराव ताकमोगे या दोन शेतकर्‍यांनी बिकट परिस्थितीत सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांचे पालकत्व गोवंश रक्षा मंडळाने स्वीकारले आहे. जैन श्वेतांबर आदेश्वर भगवान मंदिरात चातुर्मास करत असलेल्या सुलोचनार्शी साध्वीजी यांच्या प्रेरणेने पालकत्व स्वीकारण्याच्या संकल्पनेस चालना मिळाल्याची माहिती बिपीनभाई पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल पाटील व बापूराव ताकमोगे या दोन सामान्य शेतकर्‍यांनी एकत्र येऊन जनावरांसाठी छावणी सुरू केली. पाटील यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही पत्नीचे मांगल्याचे प्रतीक गहाण ठेवून पैसे उभे केले. माळरानावर बोअर मारून पाणी सुरू केले. मिळेल तो चारा उपलब्ध करून दि.26 जुलै रोजी छावणी सुरू झाली. याची बातमी वर्तमानपत्रातून आल्यानंतर प्राणीमित्र विलास शहा, शीतल शहा, महेश भंडारी यांनी 22 हजार रूपये देऊन मंगळसूत्र सोडविले. छावणीचे पालकत्व घेण्याचाही मानस व्यक्त केला.
यासाठी दि.15 ऑगस्ट रोजी शिवस्मारक येथे बैठक घेऊन केशव रांभिया, जयनारायणजी भुतडा, गौतमचंद वेद, तिलोकचंद वेद, महेश भंडारी यांनी प्रत्यक्ष छावणी स्थळाला भेट देऊन माहिती घेतली. कत्तलखान्याकडे चाललेले पशुधन आणि त्यावर अवलंबून असलेले शेतकरी बांधव यांचे परिवार उद्ध्वस्त होत आहेत. पर्यायाने एकूण अर्थव्यवस्था कोलमडून चालली आहे. अशाच एका भीषणप्रसंगी 2004 साली गोवंश रक्षा मंडळाची तात्पुरती स्थापना होऊन नेहरू नगर, विजापूर रोड येथे विनाअनुदानित तत्त्वावर चारा छावणी सुरू करण्यात आली होती. यंदाही शेतकर्‍यांची स्थिती ओळखून तात्पुरत्या स्वरूपात गोवंश रक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या वतीने शिरापूर (मोहोळ) येथील छावणीचे पालकत्व दि.26 ऑगस्टपासून स्वीकारण्यात आले आहे, असे बिपीनभाई पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस केशवजी रांभिया, गौतम वेद, तिलोकचंद वेद, विजयभाई पटेल, महेश भंडारी, जयनारायण भुतडा, रणजित शहा, अनिल पाटील, बाबुराव ताकमोगे, चेतन संघवी, हर्षल कोठारी, सुभाषचंद्र लोणावत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट..
तन मन धनाने सहकार्य करा..
भारत हा कृषिप्रधान देश आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेती, पशुधन व ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून आहे. ही संपूर्ण व्यवस्थाच निसर्गाच्या कृपादृष्टीवर अवलंबून आहे. त्यामुळे समाजबांधव, उद्योजक, व्यापारी मित्रांना आवाहन करण्यात येते की, या विनाअनुदानित तत्त्वावर चालणार्‍या बिगर सरकारी छावणीस यथाशक्ती तन मन धनाने सहकार्य करावे. इच्छुकांनी 9422458087 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी बिपीनभाई पटेल यांनी केले.