शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कचर्‍याचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच पालकमंत्री गिरीष बापट यांचा पलटवार : तातडीने प्रश्न सुटणार नाही

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

पुणे : शहराचा कचराप्रश्न सोडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे, त्यांनी राज्यशासनाकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. राज्यशासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र ते लगेच सुटण्याचा आग्रह धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केली आहे.

पुणे : शहराचा कचराप्रश्न सोडविण्याची जबाबदारी महापालिकेचीच आहे, त्यांनी राज्यशासनाकडे बोट दाखविणे चुकीचे आहे. राज्यशासनाकडे प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र ते लगेच सुटण्याचा आग्रह धरणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गिरीष बापट यांनी व्यक्त केली आहे.
पुण्याचा कचरा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुददमहून दिरंगाई करीत आहे, सरकार पुणेकरांबाबत संवेदनशील नाही. तसेच पूर्वीच्या पालकमंत्र्यांच्या तुलनेत सध्याचे पालकमंत्री सक्षम नसल्याचा आरोप महापौर दत्तात्रय धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना चव्हाण व सभागृह नेते सुभाष जगताप यांनी बुधवारी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला होता.
याबाबत गिरीष बापट यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, 'गावकर्‍यांनी कचरा टाकण्यास परवानगी द्यावी याकरिता महापालिकेने करावयाच्या दहा अटींचे अद्याप पालन करण्यात आलेले नाही. केवळ प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळाले नाहीत म्हणून कचरा प्रश्न अडकलेला नाही. प्रकल्पग्रस्तांना दाखले देण्यासाठी अभ्यास करून त्याचा अध्यादेश काढावा लागणार असल्याने त्याकरिता वेळ लागत आहे. पिंपरी-सांडस येथील जमिन वनखात्याकडून मिळविण्यासाठी हालचाली सुरू आहेत मात्र जमिनी लगेच मिळत नसतात. त्यांना जे १५ वर्षात जमले नाही ते लगेच व्हावे अशी अपेक्षा धरणे चुकीचे आहे.'

चौकट
पूर्ण ९ महिने कचरा टाकता येणार
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उरूळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी ९ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मात्र त्यातील २ महिने आताच उलटून गेले आहेत असे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले होते. मात्र ज्या दिवसापासून कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरूवात केली जाईल तेव्हा पासून ९ महिने अशी त्याची मुदत असल्याचे गिरीष बापट यांनी स्पष्ट केले आहे.