रेल्वे स्टेशनवर ट्रेन सोडून नेपाळमध्ये फिरायला गेला गार्ड, पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:27 PM2021-09-28T17:27:10+5:302021-09-28T17:27:41+5:30

Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे गोरखपूर रेल्वेमध्ये तैनात असलेला एक गार्ड पत्नी आणि मुलांना ड्युटीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो थेट नेपाळमध्ये गेला.

The guard left the train at the railway station and went for a walk in Nepal | रेल्वे स्टेशनवर ट्रेन सोडून नेपाळमध्ये फिरायला गेला गार्ड, पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि...

रेल्वे स्टेशनवर ट्रेन सोडून नेपाळमध्ये फिरायला गेला गार्ड, पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि...

Next

गोरखपूर - उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे गोरखपूर रेल्वेमध्ये तैनात असलेला एक गार्ड पत्नी आणि मुलांना ड्युटीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो थेट नेपाळमध्ये गेला. जेव्हा कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी फोन केला तेव्हा त्याचा मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. वारंवार फोन करूनही उत्तर न मिळाल्याने अखेर नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा या गार्डची गाडी स्टेशनवर उभी असल्याचे दिसून आले. ऑफीसमध्ये विचारले असता तो ड्युटीवर नसल्याचे समोर आले. हे ऐकून नातेवाईकांना धक्का बसला. त्यानंतर या रेल्वे गार्डच्या पत्नी आणि मुलाने जीआरपी ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. जीआरपीने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला. तेव्हा हा गार्ड काही परिचितांसोबत नेपाळमध्ये फिरायला गेल्याचे उघड झाले. (The guard left the train at the railway station and went for a walk in Nepal)

या गार्डची पत्नी रविवारी सकाळी जीआरपी ठाण्यात पोहोचली होते. तिने पोलिसांना सांगितले की, तिचे पती शनिवारी ड्युटीवर जातो असे सांगून घरातून बाहेर डले.. मात्र संध्याकाळपर्यंत ते परत आले नाहीत. मोबाईलवर फोन केला असता तो बंद असल्याचे दिसून आले. रात्री मुलासोबत त्यांना शोधत रेल्वे स्टेशनवर पोहोचले तर स्टँडमध्ये बाईक उभी दिसली. कार्यालय प्रभारींना फोन केला असता ते ड्युटीवर आले नसल्याचे समजले. तसेच शनिवारी त्यांची रजा असते.

काहीतरी अघटीत घडल्याची शंका व्यक्त करून पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पतीचा शोध घेण्याची विनंती केली. तेव्हा प्रभारी निरीक्षक जीआरपी ठाणे उपेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले की, सर्विलान्सच्या मदतीने तपास सुरू केला असता दुपारी या गार्डचे अखेरचे लोकेशन नेपाळ बॉर्डरवर दिसून आले. त्यानंतर नातेवाईक अधिकच त्रस्त झाले. दरम्यान, दुपारी गार्डने एका परिचिताला फोन करून तो पत्नी आणि मुलांशी खोटं बोलून नेपाळमध्ये फिरायला आला असल्याचे सांगितले. 
 

Web Title: The guard left the train at the railway station and went for a walk in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.