नवऱ्या मुलाने 300 लोकांसमोर मुलीला Kiss केले, चिडलेल्या नववधूने थेट पोलीस स्टेशन गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 14:09 IST2022-11-30T14:08:01+5:302022-11-30T14:09:14+5:30

ख्रिश्चन समाजातील लग्नामध्ये वर आणि वधूने किस करण्याची पद्धत आहे, पण हिंदू लग्नामध्ये ही पद्धत नाही.

Groom kisses bride in front of 300 people, angry bride rushes to police station | नवऱ्या मुलाने 300 लोकांसमोर मुलीला Kiss केले, चिडलेल्या नववधूने थेट पोलीस स्टेशन गाठले

नवऱ्या मुलाने 300 लोकांसमोर मुलीला Kiss केले, चिडलेल्या नववधूने थेट पोलीस स्टेशन गाठले


ख्रिश्चन समाजातील लग्नामध्ये वर आणि वधू किस करण्याची पद्धत आहे. पण, हिंदू लग्नामध्ये ही परंपरा नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यातील बहजोई पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या एका लग्नात नवऱ्या मुलाने स्टेजवरच सर्वांसमोर वधूचे चुंबन घेतले. हे कृत्य किती महागात पडेल, याची कल्पनाही त्याने केली नव्हती. मुलाने किस करताच मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठले आणि मुलावर कारवाई करण्याची मागणी केली.

26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात बदायूं जिल्ह्यातील बिलसी गावाच्या तरुणाचा संभलच्या पावसा येथील तरुणीशी लग्न झाले. पण, 28 नोव्हेंबर रोजी पावसा गावात वधू-वरांचा विधीवत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात जयमाला कार्यक्रमानंतर वधू-वर स्टेजवर बसले होते. यावेळी नवऱ्या मुलाने अचानक सर्वांसमोर वधूचे चुंबन घेतले. 

यामुळे नववधू चिडली आणि थेत उठून खोलीत गेली. कुटुंबीयांनी वधूची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती कोणाचेच ऐकायला तयार नव्हती. अखेर तिने आपल्या कुटुंबीयांसह बहजोई पोलीस स्टेशन गाठले आणि मुलासोबत राहायचे नसल्याचे सांगितले. जो माणूस 300 लोकांसमोर असे कृत्य करू शकतो, तो कसा सुधारेल, या कृत्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीने केली.
 

Web Title: Groom kisses bride in front of 300 people, angry bride rushes to police station