Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 17:01 IST2024-11-19T17:00:08+5:302024-11-19T17:01:37+5:30

लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

groom had heart attack while dancing the young man died day before the wedding | Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तपासून तरुणाला मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला नाही, त्यांनी परत तरुणाला एका खासगी रुग्णालयात नेलं, मात्र येथेही तरुणाला मृत घोषित करण्यात आलं.

कोतवाली हाथरस गेट परिसरातील भोजपूर गावात राहणारा हा एका शाळेत संगणक शिकवतो. शिवमचं सोमवारी आग्रा येथील मोहिनीसोबत लग्न होणार होतं. लग्नाच्या वरातीची सर्व तयारी झाली होती आणि नातेवाईकही आले होते. रविवारी रात्री डान्स सुरू होता. शिवम आपल्या कुटुंबासोबत आनंदाने नाचत होता. त्यानंतर तो एका ठिकाणी जाऊन बसला आणि थोड्यावेळाने अचानक खाली पडला आणि बेशुद्ध झाला.

रुग्णालयात जेव्हा शिवमला मृत घोषित करण्यात आलं तेव्हा कुटुंबीयांचा यावर विश्वास बसत नव्हता. कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात नेलं. येथेही डॉक्टरांनी शिवमला मृत घोषित केलं. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. शिवमच्या मृत्यूनंतर लग्नाचा आनंद शोकात बदलला. नातेवाईक व कुटुंबीयांना धक्काच बसला. 

आग्रा येथील टेडी बगिया येथील रहिवासी बनी सिंग यांची मुलगी मोहिनी हिच्यासोबत शिवमचं लग्न होणार होतं, मात्र शिवमच्या आकस्मिक निधनाने मुलीलाही मोठा धक्का बसला आहे. शिवमचा नाचतानाचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 
 

Web Title: groom had heart attack while dancing the young man died day before the wedding