धक्कादायक! पेन्शनसाठी त्यांनी पाच महिने आईचा मृतदेह लपवून ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 14:14 IST2018-05-23T14:14:29+5:302018-05-23T14:14:29+5:30

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

greedy son did not disclose mothers death for five months | धक्कादायक! पेन्शनसाठी त्यांनी पाच महिने आईचा मृतदेह लपवून ठेवला

धक्कादायक! पेन्शनसाठी त्यांनी पाच महिने आईचा मृतदेह लपवून ठेवला

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुलांनी त्यांच्या आईचा मृतदेह पाच महिने लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या पेन्शनसाठी त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे.  

वाराणसीतील भेलूपूरमधील कबीर नगर कॉलनीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. या भागातील सोनिका पार्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा पाच महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला सरकारी नोकरीतून निवृत्त झाली होती आणि तिला निवृत्ती वेतन मिळत होतं. आईचा मृत्यू झाल्याचं सर्वांना समजल्यास, प्रशासनाकडे तशी नोंद झाल्यास निवृत्ती वेतन बंद होईल, यासाठी मुलांनी आईचा मृतदेह तब्बल पाच महिने लपवून ठेवला. आज (बुधवारी) ही घटना समोर आली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी महिलेच्या मुलांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: greedy son did not disclose mothers death for five months