भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 10:19 IST2025-08-30T10:18:44+5:302025-08-30T10:19:03+5:30
Narendra Modi News: भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशातील राजकीय व आर्थिक स्थैर्य, धोरणांतील पारदर्शकतेमुळे तो विविध क्षेत्रांत विशेषतः हरित ऊर्जा, उत्पादन व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम केंद्र बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.

भारतात हरित ऊर्जा, उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संधी, पंतप्रधान मोदींनी जपानच्या दौऱ्यात दिली माहिती
टोकियो - भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. देशातील राजकीय व आर्थिक स्थैर्य, धोरणांतील पारदर्शकतेमुळे तो विविध क्षेत्रांत विशेषतः हरित ऊर्जा, उत्पादन व तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम केंद्र बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सांगितले.
ते जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असून टोकियो येथे आयोजित इंडिया-जपान इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत हे वक्तव्य केले. अमेरिकेने लावलेल्या ५० % शुल्कामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. याबाबत मोदी म्हणाले की, जपानचे तंत्रज्ञान व भारताची प्रतिभा एकत्र आली, तर शतकातील तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करू.
जपान तंत्रज्ञानातील महाशक्ती
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान हा तंत्रज्ञानातील महाशक्ती आणि भारत प्रतिभेचा महास्रोत आहे. हे दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, क्वांटम संगणक, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश या क्षेत्रांत परस्परांना अधिक सहकार्य करू शकतात. मेट्रो नेटवर्क असो, उत्पादन, सेमिकंडक्टर्स किंवा स्टार्टअप्स या बाबतीत जपानने भारताला सहकार्य केले आहे. भारत २०३०पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य आहे.
बंदरांची क्षमता झाली दुप्पट
पंतप्रधान नरेंद्र सांगितले की,टोकियो येथील शोरिझान दारुमा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभ दारुमा बाहुली भेट दिली.
जपान तंत्रज्ञानातील महाशक्ती
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जपान हा तंत्रज्ञानातील महाशक्ती आणि भारत प्रतिभेचा महास्रोत आहे. हे दोन्ही देश कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमिकंडक्टर, क्वांटम संगणक, जैवतंत्रज्ञान आणि अवकाश या क्षेत्रांत परस्परांना अधिक सहकार्य करू शकतात. मेट्रो नेटवर्क असो, उत्पादन, सेमिकंडक्टर्स किंवा स्टार्टअप्स या बाबतीत जपानने भारताला सहकार्य केले आहे. भारत २०३०पर्यंत ५०० गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जेचे लक्ष्य आहे.
भारतामध्ये बंदरांची क्षमता दुपटीने वाढली आहे. १६० पेक्षा अधिक विमानतळ आहेत. एक हजार किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग बांधले गेले आहेत.
जपानच्या 3 सहकार्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट उच्चगती रेल्वे प्रकल्पावरही काम सुरू आहे. जपानी कंपन्यांनी आतापर्यंत भारतात ४० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे.