नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक; लेकीच्या पाठवणीआधीच वडिलांनी सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 16:44 IST2024-02-15T16:44:25+5:302024-02-15T16:44:48+5:30

नातीच्या लग्नाच्या आनंदात तिची आजी तारादेवीही नाचू लागल्या. मात्र त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं.

grandmother heart attack while dancing granddaughter wedding father died due to heart attack in amroha | नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक; लेकीच्या पाठवणीआधीच वडिलांनी सोडला जीव

नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक; लेकीच्या पाठवणीआधीच वडिलांनी सोडला जीव

उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये दोन हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. नातीच्या लग्नात नाचताना आजीला हार्ट अटॅक आला. तर दुसरीकडे लेकीची पाठवणी करणाआधी वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गजरौला ब्लॉक परिसरातील लखमिया गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. सतीश कुमार यांच्या मुलीचं लग्न होतं. 

लग्नाच्या वरातीत डीजेच्या तालावर सर्वजण नाचत होते. मिळालेल्या माहितीनुसार, नातीच्या लग्नाच्या आनंदात तिची आजी तारादेवीही नाचू लागल्या. मात्र त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. प्रकृती अचानक बिघडल्याने त्या खाली पडल्या. कुटुंबीयांनी लगेचच तारादेवी यांना उपचारासाठी रुग्णालयात आणलं. पण डॉक्टरांनी तारादेवी यांना मृत घोषित केलं. हार्ट अटॅकमुळे तारादेवी यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना यामुळे धक्का बसला आहे. 

रामपूरच्या स्वार पोलीस स्टेशन हद्दीतील धनौरी गावात बुधवारी मुलीच्या लग्नाच्या दिवशी प्यारेलाल यांचंही हार्ट अटॅकमुळे निधन झालं. प्यारेलाल मौर्य यांच्या चार मुलांपैकी एकुलती एक मुलगी ममता हिचा विवाह जवळच्या धनौरा गावातील हरिचंद यांचा मुलगा मुनीश याच्याशी होणार होता. लग्नाची वरात येणार होती. घरात आनंदाचं वातावरण होतं. ममता देखील खूश होती. 

सकाळी दहाच्या सुमारास ममताचे वडील प्यारेलाल यांचा मृत्यू झाला. या घटनेने हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. ममता मोठा धक्का बसला असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्यारेलाल यांच्या निधनाची माहिती मिळताच वराच्या बाजूचे लोकही पोहोचले. ममताच्या लग्नाआधीच वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 

Web Title: grandmother heart attack while dancing granddaughter wedding father died due to heart attack in amroha