'जीपीएस' लोकेशनच नव्हे, मानवी हालचालीही सांगतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 06:30 IST2025-10-31T06:28:37+5:302025-10-31T06:30:57+5:30
अगदी फोनजवळ हाताच्या हालचालीही ओळखतो.

'जीपीएस' लोकेशनच नव्हे, मानवी हालचालीही सांगतो!
नवी दिल्ली: आपण वाट चुकलो की मदतीला धावणारा जीपीएस प्रत्यक्षात लोकेशनच दाखवत नाही, तर आपल्या हालचाली, आजूबाजूचे वातावरण आणि अगदी खोलीची रचनासुद्धा उघड करू शकतो! आयआयटी दिल्लीच्या नव्या संशोधनातून हा प्रकार समोर आला आहे.
'अँड्रोकॉन' प्रणालीवर झालेला हा अभ्यास एसीएम ट्रान्ड्रॉक्शन्स ऑन सेन्सर नेटवर्क्स या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या प्रणालीसाठी कॅमेरा किंवा मायक्रोफोनची गरज नाही. फक्त जीपीएसमधील सूक्ष्म डेटा जसे की डॉपलर शिफ्ट, सिग्नल पॉवर यांच्या आधारे अँड्रोकॉन सांगू शकतो की व्यक्ती बसलेली आहे की उभी, मेट्रोत आहे की फ्लाइटमध्ये किंवा खोली रिकामी आहे की गर्दीने भरलेली.
जीपीएस काय काय सांगू शकतो ?
तुम्ही बसलेले, उभे की झोपलेले आहात, मेट्रो, विमान, उद्यान किंवा गर्दीत आहात, खोली रिकामी आहे की भरलेली, इमारतीतील खोल्या, जिने, लिफ्ट्स कुठे आहेत याचा फ्लोअर मॅप तयार करतो.
कमालीची अचूकता
वातावरण ९९% ओळखण्यात अचूकता
मानवी हालचाली ८७% ओळखण्यात अचूकता
४०,००० चौ. किमी क्षेत्र व विविध फोनवर वर्षभर प्रयोग.
अगदी फोनजवळ हाताच्या हालचालीही ओळखतो.
धोका : अचूक लोकेशनची परवानगी दिलेले अँड्रॉइड अॅप संमतीशिवाय संवेदनशील माहिती मिळवू शकते.