Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 16:37 IST2025-12-31T16:35:10+5:302025-12-31T16:37:17+5:30
Nimesulide Banned News: तज्ज्ञांच्या मते, निमसुलाइडच्या अतिवापरामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो.

Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने पेनकिलर औषध 'निमसुलाइड'बाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १०० मिलीग्रामपेक्षा जास्त डोस असलेल्या निमसुलाइड गोळ्यांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारने तात्काळ बंदी घातली आहे.
'ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, १९४०' च्या कलम २६अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या औषधाचा मोठा डोस मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते, निमसुलाइडच्या अतिवापरामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो.
निमसुलाइड हे एक नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग असून, यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.या औषधाच्या दुष्परिणामांबाबत जगभरात संशोधन आणि चौकशी सुरू आहे. निमसुलाइडला पर्याय म्हणून बाजारात अनेक सुरक्षित पेनकिलर औषधे उपलब्ध आहेत.ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डाने दिलेल्या शिफारसींनंतर ही बंदी लागू करण्यात आली आहे.
डॉक्टरांचा सल्ला घ्यावे
आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे केवळ यकृतच नाही तर मूत्रपिंडावरही वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे कोणतेही वेदनाशामक औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, औषधांचा डोस स्वतःच्या मनाने ठरवू नये आणि औषधांच्या पॅकेटवरील घटक आणि डोसची क्षमता तपासून पाहावी.