शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम लोणी विक्रीवर आता सरकारची पाळत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 03:27 IST

गडकरी यांच्या पत्राची पीएमओने घेतली दखल

विकास झाडे नवी दिल्ली : वनस्पती तेलापासून काढण्यात येणाऱ्या कृत्रिम लोण्यासंदर्भात लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र लिहून अशा उत्पादनावर बंदी घालण्याची विनंती केली. पीएमओने या पत्राची दखल घेत आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाºया भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरणास सूचना देऊन यावर नियमावली तयार करण्यास सांगितले आहे.

गडकरी यांनी पीएमओला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वनस्पती तेलापासून बनविण्यात येणारे नकली कृत्रिम लोणी आरोग्यास घातक ठरत आहे. जे शेतकरी गायीच्या दुधापासून लोणी तयार करतात त्याच्या व्यवसायासही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कृत्रिम लोण्यात चरबीचे प्रमाण अधिक आहे. शिवाय ग्राहकांना आपण काय खात आहोत, हेही कळायला मार्ग नसतो. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या आदेशानंतर भारतीय सुरक्षा खाद्य आणि मानक प्राधिकरण नवीन नियमावली तयार करीत आहे. आता जी नियमावली आहे त्यात या श्रेणीतील खाद्यपदार्थांमध्ये फॅट्समर्यादा केवळ ५ टक्के आहे. त्यात सुधारणा करून २०२१ पर्यंत ३ टक्के तर २०२२ पर्यंत २ टक्यांवर आणली जात आहे. याशिवाय एका विशेष चिन्हाचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे कृत्रिम लोण्याचा किती उपयोग करण्यात आला आहे, हे स्पष्ट होईल. हॉटेल्स, ढाबा, रेस्टॉरंट इथे कृत्रिम लोण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयोग केला जातो, नकली वस्तू वापरताना त्याची मूळ आवरणे नष्ट केली जातात. अशांवर आता सुरक्षा खाद्य विभाग पाळत ठेवणार असून धाडसत्रही सुरू होईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी