सरकारी नोकरीची संधी, (SSC) च्या 3603 जागांवर अर्ज करण्यासाठी उरला एकच दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 12:26 IST2022-03-29T12:16:56+5:302022-03-29T12:26:06+5:30

केंद्र सरकारच्या आस्थापनावरील विविध खात्यांमध्ये रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येत असून कोविडनंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची ही संधी असणार आहे. 

Government Job Opportunity, (SSC) 3603 posts with only two days left to apply | सरकारी नोकरीची संधी, (SSC) च्या 3603 जागांवर अर्ज करण्यासाठी उरला एकच दिवस

सरकारी नोकरीची संधी, (SSC) च्या 3603 जागांवर अर्ज करण्यासाठी उरला एकच दिवस

मुंबई - स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३६०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी, ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत उद्या ३० एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे, एकच दिवस शिल्लक असून आजच अर्ज करा. 

केंद्र सरकारच्या आस्थापनावरील विविध खात्यांमध्ये रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येत असून कोविडनंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची ही संधी असणार आहे. 

विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

येथे जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
https://ssc.nic.in/

Web Title: Government Job Opportunity, (SSC) 3603 posts with only two days left to apply