सरकारला फसवले, २५ वर्षांनी फरार मोनिका जाळ्यात; कपूरला अमेरिकेत सीबीआयने घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 07:56 IST2025-07-10T07:56:17+5:302025-07-10T07:56:52+5:30
आंतरराष्ट्रीय सीमेची मर्यादा असताना आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईसाठी सीबीआयची कटिबद्धता दिसून येत असल्याचे या प्रत्यार्पणातून स्पष्ट होत आहे.

सरकारला फसवले, २५ वर्षांनी फरार मोनिका जाळ्यात; कपूरला अमेरिकेत सीबीआयने घेतले ताब्यात
नवी दिल्ली : आर्थिक गुन्हेगार मोनिका कपूर हिला केंद्रीय अन्वेषण विभागाने अमेरिकेतून ताब्यात घेतले आहे. अमेरिकन एअरलाइन्सच्या एक विमानाने तिचे भारतात प्रत्यार्पण होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मोनिका कपूर २५ वर्षांपासून फरार होती.
कपूरविरोधात इंटरपोल रेड नोटीस काढल्यानंतर सीबीआयच्या पथकाने तिला अमेरिकेतून ताब्यात घेतले. हे प्रत्यार्पण न्यायाच्या दृष्टीनेदेखील एक मोठे यश आहे. आंतरराष्ट्रीय सीमेची मर्यादा असताना आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईसाठी सीबीआयची कटिबद्धता दिसून येत असल्याचे या प्रत्यार्पणातून स्पष्ट होत आहे.
काय आहे प्रकरण?
‘मोनिका ओव्हरसीज’ची मालकीण मोनिकाने १९९८ साली राजन खन्ना व राजीव खन्ना या दोन भावांच्या मदतीने निर्यातीसाठी लागणारे शिपिंग बिल, इनव्हॉइस व बँक प्रमाणपत्रे यासारखी बनावट निर्यात कागदपत्रे तयार केली.
सहा परवाने मिळवण्यासाठी तिने या बनावट कागदपत्रांचा वापर केला. दरम्यान, हे परवाने विक्री केल्याने सरकारचे १.४४ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या घोटाळ्याप्रकरणी ३१ मार्च २००४ रोजी मोनिका व तिच्या भावांविरोधात गुन्हा दाखल झाला होता.