२९ हा आकडा भाजपला भोवला, उत्तर प्रदेशमधील गड गमावला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 17:34 IST2018-03-15T16:44:42+5:302018-03-15T17:34:16+5:30
उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा दणदणीत विजय झाल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातील भाजपाची २९ वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचा पराक्रम २९ वर्षीय तरुणानं केलाय. त्यामुळे भाजपाला २९ हा आकडा भोवल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

२९ हा आकडा भाजपला भोवला, उत्तर प्रदेशमधील गड गमावला!
नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचा दणदणीत विजय झाल्यानं भाजपाला मोठा झटका बसला आहे. या मतदारसंघातील भाजपाची २९ वर्षांची सत्ता उलथून टाकण्याचा पराक्रम २९ वर्षीय तरुणानं केलाय. त्यामुळे भाजपाला २९ हा आकडा भोवल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
गोरखपूर आणि फुलपूर हे दोन्ही मतदारसंघ म्हणजे भाजपाचे बालेकिल्लेच. त्यातही गोरखपूर मतदारसंघातून तब्बल २९ वर्षं गोरक्षधाम मठातीलच व्यक्ती निवडून येत होती. आधी महंत अवैद्यनाथ आणि नंतर १९९८ पासून योगी आदित्यनाथ हे गोरखपूरचे खासदार म्हणून लोकसभेत गेले. परंतु, या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाला जबरदस्त दणका बसलाय. २९ वर्षांचे तरुण-तडफदार अभियंते आणि एकाही गुन्ह्याची नोंद नसलेले कार्यकर्ते प्रवीणकुमार निषाद यांनी सपाच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली आणि बाजी मारली. गोरखपूरमधील हा पराभव भाजपासाठी धोक्याची घंटाच मानला जातोय.
प्रवीण यांनी तब्बल ४,५६,५१३ मतांसह मोठा विजय साकारला. दुसऱ्या क्रमांकावरील भाजपाचे उमेदवार उपेंद्र शुक्ल ४,३४,५१३ मते मिळाली. बसपानंही निषाद यांना पाठिंबा दिल्यानं मतविभाजन टळलं आणि भाजपाला पराभवाचा धक्का बसला.