केरळमध्ये गुगल मॅपने केली दिशाभूल; नदीत दाखवला रस्ता; २ डॉक्टरांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:38 IST2023-10-02T13:37:12+5:302023-10-02T13:38:06+5:30
गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.

केरळमध्ये गुगल मॅपने केली दिशाभूल; नदीत दाखवला रस्ता; २ डॉक्टरांचा मृत्यू
गुगल मॅपमुळे आपल्याला कुठेही जाणे सोप झाले आहे, मॅप आपल्याला कुठलाही रस्ता एका क्लिकवर दाखवते. पण, या गुगल मॅपमुळे अपघात झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे, तिथे गुगल मॅपच्या चुकीमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोचीजवळील गोथुरुथ येथील पेरियार नदीत कार पडल्याने दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि मृत्यूचे कारण बनले गुगल मॅप. कारमधील तरुण गुगल मॅपच्या मदतीने पुढे जात असताना दिशाभूल झाल्यानंतर त्यांची कार कोसळली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला.
धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून प्रवास करणाऱ्या दोन डॉक्टरांचा शनिवारी रात्री उशिरा कार केरळमधील कोचीजवळ पेरियार नदीत कोसळली यात त्यांचा मृत्यू झाला. अद्वैत (२९) आणि अजमल (२९) अशी या डॉक्टरांची नावे आहेत, एका खासगी रुग्णालयात तैनात होते. शनिवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉक्टरांसोबत प्रवास करणारे अन्य तीन लोकही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कार चालकाने गुगल मॅपच् सुचनांचे पालन केले आणि ते नदीपर्यंत पोहोचले.
मुसळधार पावसामुळे दृश्यमानता खूपच कमी होती. समोरच कोहीच दिसत नव्हते. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून ते जात होते, मात्र नकाशात दाखवलेल्या डाव्या वळणाच्या ऐवजी ते पुढे सरकले आणि नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेत अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.