पुणे : कोरोनापासून बचावासाठी जगभरात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच भारतासह जगभरातील गरीब देशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून अवघ्या २२५ रुपयांत लस उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सिरमसोबत ‘गावी’ (जीएव्हीआय) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे. याअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत लसीच्या तब्बल १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्टिटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. आॅक्सफर्ड विद्यापीठाकडून विकसित केलेल्या लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्यया टप्प्यातील मानवी चाचणी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘सिरम’ला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार या लशीच्या मानवी चाचण्यांना लवकरच सुरूवात होणार आहे. आॅक्सफर्डने केलेल्या पहिल्या चाचणीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने या लशीबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे. या लशीच्या निर्मितीसाठी सिरमसोबत ‘अॅस्ट्राझेनेका’ या कंपनीने करार केला आहे. तसेच अमेरिकेतील ‘नोव्हाव्हॅक्स’ या कंपनीशीही लसनिर्मितीसाठी करार केला आहे. आता या लशींच्या निर्मितीसाठी ‘गावी’ व गेट्स फाऊंडेशनही पुढे सरसावले आहे. या लसींच्या मानवी चाचणी यशस्वी झाल्यास निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
लय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत ! सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 19:40 IST
मोठी सकरात्मक बातमी! पुढील वर्षीपर्यंत लसीच्या तब्बल १० कोटी डोसचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट
लय भारी; कोरोनाची लस मिळणार अवघ्या २२५ रुपयांत ! सिरम'इन्स्टिट्यूटने जाहीर केली किंमत
ठळक मुद्दे‘गावी’ आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’सोबत करार