सोने, चांदी, मौल्यवान रत्ने... ४८ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिरात काय शोधण्यासाठी पोहोचले RBIचे अधिकारी?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:04 IST2026-03-25T17:03:59+5:302026-03-25T17:04:36+5:30

Jagannath Mandir News: भारतातील अनेक प्रमुख आणि जागृत देवस्थानांकडे असलेले दागदागिने आणि रत्नांचा खजिना हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेली आहे. त्यात आता ओदिशामधील पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराचं रहस्य समोर येणार आहे.

Gold, silver, precious stones... What did RBI officials find in Jagannath temple after 48 years? | सोने, चांदी, मौल्यवान रत्ने... ४८ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिरात काय शोधण्यासाठी पोहोचले RBIचे अधिकारी?  

सोने, चांदी, मौल्यवान रत्ने... ४८ वर्षांनंतर जगन्नाथ मंदिरात काय शोधण्यासाठी पोहोचले RBIचे अधिकारी?  

भारतातील अनेक प्रमुख आणि जागृत देवस्थानांकडे असलेले दागदागिने आणि रत्नांचा खजिना हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरलेली आहे. त्यात आता ओदिशामधील पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराचं रहस्य समोर येणार आहे. या रत्न भंडारामध्ये किती सोने-चांदी आणि किती हिरे जडजवाहीर आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. दरम्यान, आज दुपारी १२ वाजल्यानंतर शुभ मुहुर्तावर या रत्न भंडारामध्ये काय काय आणि किती दागदागिने आहेत, याची यादी तयार करण्याचं काम सुरू झालं आहे.

आज दुपारी १२ वाजून ९ मिनिटांपासून ते १ वाजू ४० मिनिटांपर्यंत शुभ वेळ होती. या दरम्यान, मंदिराच्या परंपरांच पालन करत दागिन्यांची मोजणी सुरू झाली. याआधी जगन्नाथ मंदिरातील दागिन्यांची मोजणी ही १९७८ साली झाली होती. त्यानंतर आता ४८ वर्षांनी पुन्हा एकदा अशी मोजणी होत आहे.

जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारातील रत्नांची यादी तयार करण्याची प्रक्रिया बुधवारी ४८ दिवसांनंतर सुरू झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जगन्नाथ मंदिर प्रशानसाने दिलेल्या माहितीनुसार रत्नांच्या  मोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी सकाळी सुमारे ११ वाजून ३० मिनिटांनी पारंपरिक धोतर आणि उपरणे परिधान करून मंदिरात दाखल झाले. मोजणीची ही प्रक्रिया दुपारी १२.०९ ते १.४५ या निर्धारित शुभ वेळेत सुरू करण्यात आली. तसेच या दरम्यान, ज्यांना मोजणी आणि यादी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यांनाच तिथे प्रवेश दिला जात होता.

दरम्यान, जगन्नाथ मंदिरातील दागिन्यांची मोजणी याआधी १३ मे ते २३ जुलै १९७८ या दरम्यान करण्यात आली होती. त्यावेली १२८.३८ किमी वजनाच्या ४५४ सोने मिश्रित वस्तू आणि २२१.५३ किलो ग्रॅंम वजनाच्या२९३  चांदी मिश्रित वस्तू आणि किमती रत्नांची नोंद झाली आहे.  

Web Title : 48 साल बाद जगन्नाथ मंदिर के खजाने का RBI ऑडिट: क्या मिलेगा?

Web Summary : 48 वर्षों बाद, RBI अधिकारी पुरी जगन्नाथ मंदिर के खजाने का ऑडिट कर रहे हैं। परंपराओं का पालन करते हुए सोना, चांदी और कीमती रत्नों की गिनती की जा रही है। पिछली ऑडिट 1978 में हुई थी, जिसमें सोना, चांदी और रत्न मिले थे।

Web Title : RBI Audits Jagannath Temple Treasures After 48 Years: What's Inside?

Web Summary : After 48 years, RBI officials are auditing Puri Jagannath Temple's treasure. Gold, silver, and precious gems are being inventoried following traditions. The last audit was in 1978, revealing significant gold, silver and gems.