शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

प्रजासत्ताक दिनानिमित्त GoAir ची ऑफर, 726 रुपयांत करा 'हवाई सफर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 15:34 IST

हवाई सफर करणा-यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोएअर(GoAir) एक खास ऑफर घेऊन आले आहे. गोएअरने आपल्या प्रवाशांसाठी 726 रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करण्याची ऑफर आणली आहे. 

नवी दिल्ली: हवाई सफर करणा-यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त गोएअर(GoAir) एक खास ऑफर घेऊन आले आहे. गोएअरने आपल्या प्रवाशांसाठी 726 रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास करण्याची ऑफर आणली आहे. ही ऑफर पाच दिवसांपूर्ती मर्यादित आहे. म्हणजेच 24 जानेवारीपासून 28 जानेवारीपर्यंत असणार आहे. तसेच, या ऑफरमध्ये प्रवाशांना 1 मार्च ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत तिकीट बुकिंग करता येईल. देशांतर्गत 23 ठिकाणी दर आठवड्याला गोएअरच्या 1544 फ्लाइटस् उड्डाण घेतात. गोएअरने 726 ते रुपयांच्या बेस फेअरमध्ये सर्वात स्वस्त ऑफर आणली आहे. याचबरोबर, गोएअरच्या वेबसाईटवरून (goair.in) तिकीट बुक केले तर 2500 रुपयांचे व्हाऊचर्सही मिळणार आहे.  

स्पाइस जेटचीही प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफरप्रजासत्ताक दिनानिमित्तानं स्पाइस जेट या विमान कंपनीनं प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. स्पाइस जेटनं प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत देऊ केली असून, ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या नावानं ही ऑफर प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ज्यात देशांतर्गत प्रवासासाठी 769 रुपयांपासून तिकीट मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तुम्हाला 2469 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या अंतर्गत 22 ते 25 जानेवारीपर्यंत 12 डिसेंबर 2018 पर्यंत ट्रॅव्हल्स पीरियड असणार आहे. देशांतर्गत प्रवाशांना चांगाल प्रवास देण्यासाठी स्पाइस जेट ही भारतातली तिसरी सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी आहे. प्रवासी या ऑफरचा फायदा मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही उचलू शकतात. या ऑफरला कोणत्याही दुस-या ऑफरशी जोडता येणार नाही. तसेच ग्रुप बुकिंगवर ही ऑफर लागू नसेल. ही ऑफर मर्यादित वेळेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जे ग्राहक लवकरात लवकर या ऑफर अंतर्गत तिकीट बुक करतील त्यांनाचा याचा फायदा उचलता येणार आहे. एअरलाइन्सची वेबसाइट, मोबाइल अॅप, ट्रॅव्हल्स पोर्टल आणि एजंटांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास याचा लाभ मिळणार आहे. 

फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवाससामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली होती. भारतातील सात मोठ्या शहरांचा सर्वात कमी भाड्यामध्ये आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एअर एशिया या कंपनीनं या योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी तुम्हाला 99 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एअर एशिया कंपनीनं 99 रुपयांमध्ये तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीचा प्रवास उपलब्ध करून दिला आहे. एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1299 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास 2399 रुपयांत करता येणार होतं. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी होती. तसेच 31 मार्च 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे.

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Travelप्रवासspicejetस्पाइस जेट