हे सगळं बाहेर जाऊन करा...मेट्रोत रोमान्स करणाऱ्या जोडप्याला महिलेने झापलं; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 19:32 IST2023-09-08T19:30:52+5:302023-09-08T19:32:26+5:30
मागील काही दिवसांपासून मेट्रोमध्ये जोडप्यांच्या रोमान्सचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

हे सगळं बाहेर जाऊन करा...मेट्रोत रोमान्स करणाऱ्या जोडप्याला महिलेने झापलं; Video व्हायरल
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून दिल्लीतील मेट्रोमध्ये कपल्सच्या रोमान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांकडून यावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता अशाच प्रकारचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात रोमान्स करणाऱ्या कपलला एका महिलेने चांगलेच झापले.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रोमध्ये रोमान्स करणाऱ्या जोडप्याला झापताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जोडपे मेट्रोमध्ये एकमेकांच्या गालाला चिमटे घेत होते, तसेच इतर कृत्य करत होते. यामुळे महिला संतापली आणि तिने सर्वांसमोर त्या जोडप्यावर राग काढला. तुम्ही अशा गोष्टी बाहेर जाऊन करा, असं महिला व्हिडिओमध्ये म्हणत आहे.
Aunty is very jealous i can say that 😅#DelhiMetro follow for more pic.twitter.com/r5alwpgI4C
— Metro Creature (@MetroCreature) September 8, 2023
या घटनेवर लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी महिलेचे समर्थन केले, तर काहींनी त्या जोडप्याचे समर्थन केले. विशेष म्हणजे, यापूर्वी यापेक्षाही विचित्र व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काही व्हिडिओमध्ये किसिंग तर काहींमध्ये त्याच्याही पुढे गेल्याचे दिसत आहे. अशा घटनांमुळे प्रशासनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.