शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक भूक निर्देशांक अहवाल; देश ९४ व्या स्थानावर, भारतामध्ये १४ टक्के लोक कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 07:54 IST

गेल्या वर्षी ११७ देशांच्या या यादीत भारत १०७व्या स्थानावर होता. भारताचे शेजारी देश बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानमध्येही कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. ()

नवी दिल्ली : भारतातील १४ टक्के जनता कुपोषित असल्याचे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. कुपोषणाच्या समस्या असलेल्या देशांमध्ये जागतिक भूक निर्देशांक यादीत भारत ९४व्या स्थानावर आहे.

कुपोषण रोखण्यासाठी भारतामध्ये असलेल्या योजनांची अत्यंत ढिसाळपणे अंमलबजावणी करण्यात येते. तिथे देखरेखीचा अभाव असतो. भारतातील कुपोषणाची समस्या गंभीर होण्यास तेथील मोठ्या राज्यांतल्या अव्यवस्थित कारभार कारणीभूत आहे असे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या अहवालात म्हटले आहे. 

गेल्या वर्षी ११७ देशांच्या या यादीत भारत १०७व्या स्थानावर होता. भारताचे शेजारी देश बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानमध्येही कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. 

या यादीत बांगलादेश ७५व्या, पाकिस्तान ७८व्या तर म्यानमार ८८व्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंका हे अनुक्रमे ७३ व ६४ व्या क्रमांकावर आहेत. या दोन देशांमध्ये कुपोषणाची समस्या त्यांच्या शेजारी देशांइतकी गंभीर नाही. कुपोषणाची समस्या खोलवरभारतामध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण ३७.४ टक्के आहे. कुपोषणाने मरण पावणाऱ्या बालकांचे प्रमाण ३.७ टक्के आहे. तर उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण १७.३ टक्के आहे. त्यावरून भारतामध्ये कुपोषणाची समस्या किती खोलवर रुजली आहे हे दिसून येते.बालमृत्यूचे प्रमाण झाले काही अंशी कमी - भारतामध्ये ५ वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण - 37.4%कुपोषणाने होणारे मृत्यू - 3.7%कुपोषणामुळे बालकांची नीट वाढ न होण्याचे प्रमाण नेपाळ, बांगलादेश, भारत, पाकिस्तान या देशांमध्ये लक्षणीय आहे असे यासंदर्भात १९९१ ते २०१४ या कालावधीत गोळा केलेल्या माहितीवरून दिसून येते. या काळात भारतात पाच वर्षे वयाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी कमी झाले.न्यूमोनिया, डायरिया आदी आजारांमुळे लहान मुले मरण पावण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा बदल घडून आला.

टॅग्स :Indiaभारत