शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेडिरेकनरनुसार मिळकत कराचे सुधारित मूल्य द्या महापौरांचे आदेश: समितीची झाली पहिली बैठक

By admin | Updated: July 22, 2015 00:34 IST

सोलापूर :

सोलापूर :
रेडिरेकनरनुसार (शासकीय मूल्यांकन तक्ता) शहरातील सुधारित मिळकत कराच्या आकडेवारीचा अहवाल १0 ऑगस्टपर्यंत सादर करा, असे आदेश महापौर सुशीला आबुटे यांनी कर संकलन विभागाला दिले.
मिळकतीचे फेरमूल्यांकन करण्यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक महापौर आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी घेण्यात आली. बैठकीला समितीचे अध्यक्ष तथा सभागृहनेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते कृष्णाहरी दुस्सा, दिलीप कोल्हे, भीमाशंकर म्हेत्रे, आनंद चंदनशिवे, शिवलिंग कांबळे, आरिफ शेख, सहायक आयुक्त अमिता दगडे—पाटील, श्रीकांत मायकलवार, प्रदीप साठे, कर संकलन प्रमुख चंद्रभागा बिराजदार, संगणक विभाग प्रमुख सचिन कांबळे आदी उपस्थित होते. जीआयएस प्रणालीच्या (भौगोलिक माहिती तंत्रज्ञान) सर्वेक्षणानुसार शहरात साडेतीन लाख मिळकती असल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणावरून मिळकतीची कॅटेगिरी करून कर कशापद्धतीने लावायचा याचे शहरी गावठाण, मध्यम भाग आणि हद्दवाढ असे तीन भाग करून एक मॉडेल अहवाल तयार करून समितीपुढे सादर करावा, असे आदेश आबुटे यांनी दिले. चंदनशिवे, शेख यांनी झोपडप˜ीत राहणार्‍यांना कर वाढीतून दिलासा द्यावा, अशी सूचना केली.
सोलापुरातील मिळकत कराचे १२ वर्षांपासून रिव्हिजन झालेले नाही. महापालिकेच्या रेकॉर्डवर २ लाख ३९ हजार मिळकती आहेत. इतक्याच मिळकतीकडून कर वसूल केला जातो. आणखी १ लाख मिळकती शोधल्या तर १00 कोटींचा महसूल वाढणार आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी हा निधी उपयोगी पडणार आहे. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी फेब्रुवारी २0१५ मध्ये मिळकत करवाढीचा विषय सभेकडे पाठविला होता. मिळकतीचे ठिकाण, वय आणि किमतीवरून मोठी वाढ सुचविण्यात आली होती. याला नागरिकांचा विरोध होईल म्हणून सभागृहाने यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी हेमगड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या समितीची आज पहिलीच बैठक झाली.