तिसरे मूल जन्माला घाला, ५१ हजार रुपये मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 09:50 IST2024-08-24T09:49:50+5:302024-08-24T09:50:15+5:30

पूर्वीच्या तुलनेत आता कुटुंबात एकच मूल किंवा जास्तीत जास्त २ मुले ही संकल्पना आली आहे.

Give birth to third child, get Rs.51 thousand | तिसरे मूल जन्माला घाला, ५१ हजार रुपये मिळवा

तिसरे मूल जन्माला घाला, ५१ हजार रुपये मिळवा

किशनगड (राजस्थान) : जे जोडपे तिसरे अपत्य जन्माला घालेल त्या जोडप्याला ५१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असून समाजाच्या कार्यक्रमात त्यांचा गौरवही करण्यात येणार असल्याची घोषणा माहेश्वरी समाजाने केली आहे. राजस्थानमधील किशनगड येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

अखिल भारतीय माहेश्वरी समाजाचे कार्यकारिणी सदस्य रमेश माहेश्वरी म्हणाले की, सर्वेक्षण केल्यानंतर सध्या समाजाची लोकसंख्या १५-१६ लाखांवरून आठ लाखांवर आली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे समाजाची लोकसंख्या पुन्हा एकदा वाढावी यासाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पूर्वीच्या तुलनेत आता कुटुंबात एकच मूल किंवा जास्तीत जास्त २ मुले ही संकल्पना आली आहे. आधुनिक विचारसरणीमुळे आता पती-पत्नी दोघेही नोकरी करत असताना मोठे कुटुंब चालवणे शक्य होत नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Give birth to third child, get Rs.51 thousand