प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:22 IST2025-07-06T09:21:43+5:302025-07-06T09:22:43+5:30
एका तरुणाचं गावातीलच एका मुलीवर प्रेम जडलं होतं. दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला अन्...

प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था
प्रेमासाठी माणूस अगदी काहीही करायला तयार असतो. वेळेप्रसंगी अगदी सगळे धोके जाणून देखील आपल्या प्रिय व्यक्तीची भेट घेण्याचे धाडस काही लोक करतात. पण, असंच धाडस करणाऱ्या एका तरुणाला आता फार महागात पडलं आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील हायाघाट पोलीस ठाण्याच्या बिलासपूर गावातील ही घटना आहे. एका तरुणाचं गावातीलच एका मुलीवर प्रेम जडलं होतं. दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि १ जुलै रोजी दोघेही घरातून निघाले. पण दोन दिवसांनी म्हणजेच ३ जुलै रोजी ते परत आले.
प्रेमामुळे तरुणाला "तालिबानी" शिक्षा!
जेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना हे प्रेमसंबंध कळाले, तेव्हा त्यांनी संतापात त्या तरुणाला अमानवी वागणूक दिली. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही लोक त्या तरुणाचे केस कापताना आणि त्याच्या चेहऱ्यावर काळं फासताना दिसले होते. घडल्या प्रकारामुळे तरुण खूप घाबरला होता. त्याला खूप मारहाणही करण्यात आली होती.
दोघे वेगवेगळ्या धर्माचे
पोलिसांच्या चौकशीत समजले की, त्या तरुण आणि तरुणीचे प्रेमसंबंध होते आणि दोघे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी रागातून त्या तरुणाला गावातच सर्वांसमोर शिक्षा दिली.
पोलिसांची कारवाई
दरभंगा सदरचे एसडीपीओ राजीव कुमार यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओबाबत चौकशी केली असता, ही घटना बिलासपूर गावात घडल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी व्हिडीओची सत्यता तपासून मुलीच्या भावाला अटक केली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही प्रौढ आहेत आणि सध्या पोलिसांच्या संरक्षणात आहेत. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.