धक्कादायक! प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन गेला प्रियकर; शारीरिक संबंध ठेवताना तरूणीचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:05 IST2023-03-27T17:04:52+5:302023-03-27T17:05:50+5:30
Girlfriend Dies While Having Sex With Boyfriend : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन गेला प्रियकर; शारीरिक संबंध ठेवताना तरूणीचा जागीच मृत्यू
रामनगर : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. अतिरक्तस्रावामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला निर्जनस्थळी नेले आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. यादरम्यान पीडितेला जास्त रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. खरं तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कागलीपुरा पोलीस अधिकार्यांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
पीडित व आरोपी दोघेही कागलीपुरा येथील जवळच्या गावातील रहिवासी आहेत. एकत्र शिकत असताना दोघेही प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलगी ही विद्यार्थिनी होती, तर आरोपीचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपीने तिची हत्या केली नाही. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर आरोपीने त्याच्या मित्रांची मदत मागितली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बंगळुरू-म्हैसूर रोडवरील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे." मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी अधिक सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"