फेसबुकवर झालेल्या मित्राला भेटण्यासाठी हाँगकाँगहून उत्तर प्रदेशला आली तरुणी, लग्नाबाबत म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:26 IST2024-12-10T17:25:15+5:302024-12-10T17:26:14+5:30
उत्तर प्रदेशमध्ये सीमा हैदरसारखं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र, यावेळी ही महिला पाकिस्तानातून नसून हाँगकाँगमधून आली आहे.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशमध्ये सीमा हैदरसारखं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मात्र, यावेळी ही महिला पाकिस्तानातून नसून हाँगकाँगमधून आली आहे. माया तमांग असं तिचं नाव आहे. मैनपुरी गावात राहणाऱ्या तिच्या फेसबुक मित्राला भेटण्यासाठी ती एवढ्या लांबून आली आहे. याबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या परदेशी महिलेला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमधील माया तमांग मैनपुरीच्या मानपूर हरी गावात भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं नाव किशन कुमार आहे. माया आणि किशन यांची तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर भेट झाली होती. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग आणि गुड नाईट असे मेसेज ते एकमेकांना पाठवायचे. त्यानंतर संवाद वाढला आणि काही वेळातच दोघांची चांगली मैत्री झाली.
ही मैत्री आता इतकी घट्ट झाली आहे की, माया तमांग तिचा मित्र किशन कुमारला भेटण्यासाठी हाँगकाँगहून मैनपुरीला आली आहे. माया हाँगकाँगमध्ये चाइल्ड केअर टेकर म्हणून काम करते. तिचे अजून लग्न झालेलं नाही. माया तमांगला जेव्हा विचारण्यात आलं की, भविष्यात लग्न करण्याचा तिचा विचार आहे का? ती किशन कुमारशी लग्न करेल का? यावर माया म्हणाली की, आमची चांगली मैत्री आहे. लग्नाबद्दल अजून काही विचार केलेला नाही.
माया तमांगचा फेसबुक फ्रेंड किशन कुमार हा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे. किशनने सांगितलं की, त्यानेही अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही. पुढे जे होईल ते आम्ही माध्यमांना सांगू. सध्या आम्ही फक्त मित्र आहोत. त्यापेक्षा जास्त काही नाही. परदेशातून गावी आलेल्या माया तमांगची शहरात चर्चा आहे. माया १३ डिसेंबरला आपल्या देशात परतणार आहे.