संतापजनक! विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 04:53 IST2018-07-08T04:53:18+5:302018-07-08T04:53:38+5:30

बिहारमच्या छप्रा जिल्ह्यातील सारण येथील खासगी शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर डिसेंबरपासून बलात्कार होत होते

Girl Student raped by student, teacher and headmaster | संतापजनक! विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार

संतापजनक! विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केला विद्यार्थिनीवर बलात्कार

पाटणा - बिहारमच्या छप्रा जिल्ह्यातील सारण येथील खासगी शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर डिसेंबरपासून बलात्कार होत होते आणि त्यात शाळेतील ११ विद्यार्थ्यांबरोबरच दोन शिक्षक व मुख्याध्यापकही सहभागी होते, असे उघडकीस आले असून, त्यामुळे खळबळ माजली आहे.
या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक उदय मुकुंद व शिक्षक बालाजी यांना अटक करण्यात आली असून, अन्य एक शिक्षक, तसेच ११ विद्यार्थी यांचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. गेले सात महिने हा प्रकार सुरू असल्याची तक्रार पीडित मुलीने केल्यानंतर लगेच पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर महिन्यात काही विद्यार्थ्यांनी तिला जबरदस्तीने नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यातील काहींनी त्याचे मोबाइलवर चित्रीकरणही केले. त्या चित्रीकरणाच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून ते विद्यार्थी तिच्यावर नंतरही बलात्कार करीत राहिले. मुलीने घाबरून त्याची माहिती घरच्यांनाही दिली नाही.
हे प्रकार वारंवार होऊ लागल्याने विद्यार्थिनीने दोन शिक्षकांकडे विद्यार्थ्यांची तक्रार केली, पण त्या तक्रारीची दखल घेऊन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी दोन्ही शिक्षकांनीही तिच्यावर बलात्कार केले. त्यामुळे विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांकडे तक्रार केली, पण मुख्याध्यापकांनीही विद्यार्थी व शिक्षकांवर कारवाई केली नाही आणि त्यांनीच तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे अखेर मुलीने सारणच्या महिला पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे तक्रार केली.

काही विद्यार्थी अल्पवयीन?

त्या मुलीने मुख्याध्यापक, दोन्ही शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. आम्ही आतापर्यंत मुख्याध्यापक, एक शिक्षक यांच्यासह एकूण चार जणांना अटक केली आहे. त्या शाळेत जाऊ नही पाहणी केली असून, अन्य काही विद्यार्थी व शिक्षकांची चौकशी केली आहे. आम्ही अन्य १४ जणांचा शोध घेत आहोत, असे सारण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरकिशोर राय यांनी सांगितले. विद्यार्थ्यांपैकी काही जण अल्पवयीन असू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Girl Student raped by student, teacher and headmaster