शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

ह्दयद्रावक घटना! खड्ड्यानं घेतला युवतीचा बळी, १५ मिनिटं कुणीच मदतीला आलं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 4:54 PM

पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे पाण्याने भरलेला खड्ड्यात दुचाकीचं पुढचं चाक गेले आणि तिघंही एकमेकांवर पडले.

ठळक मुद्दे२१ वर्षीय सरिता रणदा राहुल आणि सुजातासोबत खंडवा नाका इथं येत होतीसरिता गुजराती कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्गाला शिकायला होती. सुजातासोबत ती मूसाखडी इथं भाड्याने खोली घेऊन राहत होती. राहुलने तिला हॉस्पिटला नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

इंदूर – रस्त्यावरील खड्डे ही समस्या केवळ एका शहरापुरती मर्यादित नाही तर देशात अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेल्याचं दिसून आलं आहे. अलीकडेच इंदूरमध्ये शनिवारी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या युवतीचा खड्ड्याने बळी घेतला आहे. सरिता रणदा असं या युवतीचं नाव आहे. सरिता भाऊ राहुल आणि मैत्रिण सुजातासोबत स्कूटरवरुन जात होते तेव्हा ही दुर्घटना घडली.

पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं होतं. त्यामुळे पाण्याने भरलेला खड्ड्यात दुचाकीचं पुढचं चाक गेले आणि तिघंही एकमेकांवर पडले. या अपघातात सुजाता गंभीर जखमी झाली. तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची पोलीस चौकशी करत आहेत. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. २१ वर्षीय सरिता रणदा राहुल आणि सुजातासोबत खंडवा नाका इथं येत होती. पावसामुळे स्कूटरचं चाक एका खड्ड्यात पडलं त्यानंतर सरिता आणि सुजाता खाली पडल्या. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सरिता बेशुद्ध पडली होती. राहुलने तिला हॉस्पिटला नेले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर सुजाताची अवस्था गंभीर आहे. राहुलला किरकोळ दुखापत झाली आहे.

१५ मिनिटं लोकांची मदत मागत राहिला परंतु...

राहुलने माध्यमांशी बोलताना सांगितले की, सरिता गुजराती कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्गाला शिकायला होती. सुजातासोबत ती मूसाखडी इथं भाड्याने खोली घेऊन राहत होती. मी होळकर सायन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. मी राहायला खंडवा नाका परिसरात आहे. सरिताच्या घरी संध्याकाळी पाणी येत नव्हते म्हणून सुजाता आणि सरिता यांना घेऊन मी खंडवा नाका येथील माझ्या रुमवर घेऊन येत होतो. रिंगरोडवर पावसामुळे बरेच मोठे खड्डे पडले आहेत. मी खूप काळजीनं स्कूटर चालवत होतो परंतु पाण्याने भरलेला खड्डा न दिसल्याने स्कूटरचं पुढचं चाक पाण्यात गेले आणि माझं नियंत्रण सुटलं असं त्याने सांगितले.

स्कूटर खड्ड्यात पडली असता मी एका बाजूला पडलो आणि सरिता, सुजाताही कोसळल्या. सरिता बेशुद्ध झाल्याने जवळपास १५ मिनिटं आम्ही लोकांकडे मदत मागत होतो. त्यानंतर एक प्रवासी त्याठिकाणी थांबला त्याने रिक्षावाल्याला थांबवलं. मी तात्काळ सरिताला घेऊन भंवरकुआ येथील हॉस्पिटलला उपचारासाठी आणलं परंतु ५ मिनिटांनी डॉक्टर म्हणाले, सरिताचा मृत्यू झाला आहे. तर सुजाताला त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अशी माहिती राहुलनं दिली.

टॅग्स :AccidentअपघातPotholeखड्डेMadhya Pradeshमध्य प्रदेश