शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

एका ट्विटने घडवून आणली बाप-लेकीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2018 4:16 PM

योग्यरित्या वापर केल्यास सोशल मीडिया हा आणीबाणीच्या प्रसंगात मदतगार ठरू शकतो. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे.

मथुरा - योग्यरित्या वापर केल्यास सोशल मीडिया हा आणीबाणीच्या प्रसंगात मदतगार ठरू शकतो. अशीच एक घटना मथुरा येथे घडली आहे. येथे एका तरुणीने केलेल्या ट्विटची दखल घेत पोलिसांनी तिच्या हरवलेल्या वडिलांना शोधून काढले. या संदर्भातील सविस्तर हकिकत अशी की, मुंबईत राहणाऱ्या तमन्ना  गुप्ता यांनी ट्विट करून आपल्या वडलांना मदत करण्याची विनंती केली होती. माझ्या वडलांनी मला नुकताच फोन करून आपण मथुरा येथील गोवर्धन येथे आहोत असे सांगितले आहे. तुम्ही त्यांना तात्काळ मदत करू शकता का? अशी विचारणा करत तमन्ना यांनी हे ट्विट उत्तर प्रदेश पोलीस, मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला टॅग केली होती. तमन्ना यांनी वडलांना मदत करण्यासाठी केलेले विनंतीपर ट्विट पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासास सुरुवात केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आयजी रेंज आक्र आणि एडीजी झोन आग्रा यांना हे ट्विट टॅग करून या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. त्यानंतर मथुरा पोलिसांनी गोवर्धन पोलीस ठाण्यास आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे या ट्विटला उत्तर देताना सांगितले. तसेच आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांस हरवलेल्या राधेश्याम गुप्ता यांना छायाचित्राच्या मदतीने शोधून काढण्याचे आदेश दिले. अखेर हरवलेले राधेश्याम गुप्ता हे मथुरा येथील गोवर्धन येथे सापडले.  वडील राधेश्याम गुप्ता हे बेपत्ता झाल्यानंतर मुलगी तमन्ना हिने ट्विटरवर  फाइंड माय फादर हा हॅशटॅग बनवून त्यांचा एक फोटो ट्विट केला. तसेच त्यांचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन केले.  66 वर्षीय राधेश्याम गुप्ता हे मुंबईजवळील नालासोपारा येथे शेवटचे दिसले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. मात्र अखेरीस ते मथुरा येथे सापडले. वडील सापडल्यानंतर तमन्ना यांनी सर्वांचे आभार मानले. विशेषत: उत्तर प्रदेश पोलीस, मथुरा पोलीस आणि गोवर्धन पोलिसांचे त्यांनी विशेष आभार मानले. तसेच याचे श्रेय त्यांनी डिजिटल इंडियालाही देत हे ट्विट पीएमओलाही टॅग केले.  

 

टॅग्स :Twitterट्विटरPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशnewsबातम्या