ईश्वरपूर : नेर्ले (ता. वाळवा) येथील डॉ. अमित सूर्यवंशी यांनी मलेशियातील क्वॉलालंपूर ते बंगळुरू विमान प्रवासादरम्यान ३५ हजार फुटाच्या उंचीवर असताना बंगळुरूच्या १७ वर्षीय योग खेळाडू मुलीचे प्राण वाचवत तिला जीवदान दिले. डॉ. सूर्यवंशी हे अंकलखोप येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहतात.बुधवारी पहाटे डॉ. सूर्यवंशी हे या विमानातून प्रवास करीत होते. त्याचवेळी मलेशियातील योगा स्पर्धा खेळून बंगळुरू येथील १७ वर्षांची युवती तिच्या कुटुंबासह परतत होती. यावेळी तिला विमानातच फिट येऊन ती खुर्चीवरून खाली पडून बेशुध्द अवस्थेकडे निघाली होती. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी क्षणाचाही विलंब न करता या मुलीकडे धाव घेत तिच्यावर उपचार सुरू केले.या मुलीच्या तोंडातून आलेला फेस त्यांनी बाजूला करत तिचा श्वास घेण्याचा मार्ग मोकळा केला. तसेच तिच्या दातखीळ बसलेल्या तोंडामध्ये धाडसाने दोन बोटे घालून जीभ चावण्यापासून रोखले. याचवेळी अंबू बॅगव्दारे तिला ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला. तिच्या भोवतालचे वातावरण मोकळे ठेवले. शेवटी विमानाच्या पाठीमागील लॉबीमध्ये तिला ठेवून तिच्या नाडीचे ठोके, हृदय गती यावर लक्ष केंद्रीत करत तिला औषध खायला देऊन प्रवास संपेपर्यत डॉ. सूर्यवंशी यांनी तिच्यावर लक्ष ठेवले. यादरम्यान विमानातील इतर प्रवासी भयभीत झाले होते. मात्र, त्यांनाही दिलासा देत डॉ. सूर्यवंशी यांनी हवाई सुंदरी आणि विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने या मुलीचे प्राण वाचवण्यात यश मिळवले. या कामगिरीबद्दल विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना आभारपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त केली.
Web Summary : Dr. Amit Suryavanshi saved a 17-year-old yoga athlete's life on a flight from Kuala Lumpur to Bengaluru. The girl suffered a seizure mid-air. Dr. Suryavanshi, an health officer, quickly administered treatment, clearing her airway and preventing her from biting her tongue, stabilizing her until landing. The airline staff expressed gratitude.
Web Summary : डॉ. अमित सूर्यवंशी ने कुआलालंपुर से बेंगलुरु जा रही उड़ान में 17 वर्षीय योग एथलीट की जान बचाई। लड़की को बीच हवा में दौरा पड़ा। स्वास्थ्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी ने तुरंत इलाज किया, उसका श्वास मार्ग साफ किया और उसे जीभ काटने से बचाया, और लैंडिंग तक उसे स्थिर रखा। एयरलाइन कर्मचारियों ने आभार व्यक्त किया।