पोलिसांसमोर तरुणीची चालकाला बेदम मारहाण, आता सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:53 PM2021-08-02T15:53:36+5:302021-08-02T15:56:37+5:30

Girl Slapping Cab Driver: लखनऊतील घटना व्हायरल झाल्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आलंय.

girl beat cab driver in lucknow , now netizens demand to arrest girl after cctv footage come out | पोलिसांसमोर तरुणीची चालकाला बेदम मारहाण, आता सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सत्य

पोलिसांसमोर तरुणीची चालकाला बेदम मारहाण, आता सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सत्य

googlenewsNext
ठळक मुद्देआता सोशल मीडियावरुन त्या तरुणीच्या अटकेची मागणी होत आहे.

लखनऊ: सध्या सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील लखनऊचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओत भर रस्त्यात एक महिला कॅब ड्रायव्हरला पोलिसांसमोर मारहाण करताना दिसत आहे. आता प्रकरणाची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. या प्रकरणाची सुरुवात कशी झाली, हे त्या फुटेजमधून दिसत आहे.

सीसीटीव्हीतून समोर आले सत्य
प्रकरण लखनऊमधील अवध चौकातील आहे. तेथे लागलेल्या सीसीटीव्हीतून समोर आलं की, रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक होतं. यादरम्यान संबंधित तरुणी चालत्या गाड्यांमधून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करू लागली. यावेळी एक कॅब अचानक तिच्या समोर आली. त्या कॅबचा त्या तरुणीला धक्काही लागला नाही, पण तरही तरुणीने त्या कॅब ड्रायव्हरला गाडीतून बाहेर काढून मारहाण सुरू केली.

तरुणीला अटक करण्याची मागणी
सुरुवातीला ही घटना व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच वाटलं होतं की, या घटनेत त्या कॅब ड्रायव्हरची चुकी आहे. पण, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सत्य समोर आलं. यानंतर आता सोशल मीडियावरुन त्या तरुणीच्या अटकेची मागणी होत आहे. ट्विटरवर #ArrestLucknowGirl ट्रेंड करत आहे. याप्रकरणी आता पोलिस अधिक तपास करत आहेत.
 

Read in English

Web Title: girl beat cab driver in lucknow , now netizens demand to arrest girl after cctv footage come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.