लग्न कर, नाहीतर बलात्काराच्या केसमध्ये अडकवेन, IPS अधिकाऱ्याला महिला करू लागली ब्लॅकमेल, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:52 IST2023-08-22T14:51:36+5:302023-08-22T14:52:17+5:30
Crime News: आयपीएस अधिकारी बनलेल्या एका अधिकाऱ्याला महिला डॉक्टरने हनिट्रॅपमध्ये फसवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लग्न कर, नाहीतर बलात्काराच्या केसमध्ये अडकवेन, IPS अधिकाऱ्याला महिला करू लागली ब्लॅकमेल, त्यानंतर...
राजस्थानमध्ये आरएएस वरून आयपीएस अधिकारी बनलेल्या एका अधिकाऱ्याला महिला डॉक्टरने हनिट्रॅपमध्ये फसवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कथित महिला डॉक्टरची संबंधित तरुण आरएएस अधिकारी असताना त्याच्यासोबत मैत्री झाली होती. मात्र हा तरुण आयपीएस अधिकारी बनताच ही महिला तिच्या पतीलाही सोडण्यास तयार झाली. ही महिला आयपीएस अधिकारी बनलेल्या तरुणावर लग्नासाठी दबाव आणू लागली. तसेच जेव्हा या आयपीएस अधिकाऱ्याने तसे करण्यास नकार दिला. तेव्हा या महिलेने त्याला खोट्या केसमध्ये अडवण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची मागणी केली. त्रस्त होऊन पीडित आपीएस अधिकाऱ्याने आता जयपूरमधील पोलीस ठाण्यात धाव घेत सदर महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जयपूरच्या मालवीयनगर येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय राजेश कुमार मीणा यांनी सांगितले की, सन २०२० मध्ये डुंगरपूर मध्ये प्रोबेशन आरएएसच्या पदावर काम करत असताना कोरोना काळात माझी ओळख मेडिकल विभागात काम करणाऱ्या डॉ. प्रियंका यांच्याशी झाली. तेव्हा प्रियंका यांनी त्यासुद्धा आरएएसची तयारी करत आहेत, असं सांगितलं. त्यानंतर आम्हा दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं.
जेव्हा जवळीक वाढली तेव्हा ही महिला विवाहित असूनही राकेशसाठी घरातून डबा बनवून आणू लागली. तसेच ती त्यांची चांगळी मैत्रिण बनली. एवढंच नाही तर गरजेच्या वेळी या महिलेने राजेश यांना ३ लाख रुपये दिले होते. राजेश यांनी नंतर ते परत केले. त्यानंतर २०२१ मध्ये या तरुणाची नियुक्ती एसडीएम चाकसू या पदावर झाली. त्यानंतरही ही महिला त्यांना भेटण्यास येत असे.
त्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये राजेश आयपीएस बनताच प्रियंकाने भलतीच मागणी सुरू केली. ती तिच्या पतीला घटस्फोट देऊन राजेशसोबत लग्न करण्यास तयार झाली. मात्र राकेशने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर प्रियंका राजेशला धमकी देऊन ब्लॅकमेल करू लागली. एवढंच नाही तर प्रियंकाने राजेशला खोट्या केसमध्ये अडकवून ५० लाख रुपयांची मागणीही केली. या सर्वामुळे त्रस्त झालेल्या आयपीएल, राजेश यांनी प्रियंका विरोधात एफआयआर दाखल केली, आता पोलीस पुढील तपास करत आहेत.